
प्रतिनिधी: सुरेश बोरले
मुंबई ” सबरी प्रतिष्ठान” तर्फे प्रतिवर्षी प्रमाणे,ह्या वर्षीही बालदिनाचे औचित्य साधून! विले पार्ले पूर्व येथील,सतीश दुभाषी मैदान(प्लये ग्राउंड)येथे दि.9ते 14 नोव्हेंबर पर्यंत “बालजल्लोष”कार्यक्रमाचे भरगच्च आयोजन मोफत करण्यात आलेले आहे.विले पार्ले व मुबैईतील 4ते 14 वर्षा पर्यंतच्या मुलांना ह्या जल्लोषात सामील होता येईल,त्याशिवाय पाल्यानीही ह्या कार्यक्रमास उपस्थित राहून ह्या जल्लोषची शान वाढवायची आहे.हे त्यांनी विसरून चालणार नाही. सतत गेली 15 वर्षे हा उपक्रम, शबरीचे अध्यक्ष,मा.विनायक सुर्वे आपल्या क्रियाशिल व हरहूननरी कार्यकर्त्यांनसहित,हा कार्यक्रम यशस्वी रीतीय ,पार पाडीत आहेत.उद्देश व ध्यास एकच सर्वांगीण बालविकास?खालील प्रमाणे कार्यक्रमाची वेळ व आखणी आहे,वाचकांनी नोंद घ्यावी .