
एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे
मुंबई : आळंदी, पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय महाराष्ट्र थाई बॉक्सिंग स्पर्धेत नटवर नगर मुंबई पब्लिक स्कूल, डी. एन. नगर मुंबई पब्लिक स्कूल तसेच अथर्व कॉलेज ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट, मालवणी येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी एकूण ५ सुवर्ण, १ रौप्य व २ कांस्य पदके पटकावत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
पार्थ राणे, विराज चव्हाण, देबाशीष पलिता, रुद्र पांडे व खुशी गुप्ता यांनी सुवर्ण पदकांवर नाव कोरले, तर रिद्धी चौहान हिने रौप्य पदक मिळवले.
यश्वी सरोज व अनुराग मौर्या यांनी कांस्य पदकांची कमाई केली.
या यशाबद्दल सर्व विजेत्या खेळाडूंचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक गौरव अशोक पांचाळ, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग व पालकांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळा व कॉलेजच्या क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेत मोठी भर पडली आहे.
Very food