
प्रतिनिधी : राजेश पंड्या
मुंबई : दहिसर प्लेटफॉर्म दोन आणि तीन वर छप्पर लाण्याचे काम सुरु.पश्चिम रेल्वेच्या दहिसर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोन आणि तीन (उत्तरेकडे) दरम्यानचे छप्पर गेल्या दीड वर्षांपासून बसवले गेले नव्हते, या कामा अभावी १५० मीटर पर्यंतच्या परिसरात कमी अंतरावर फक्त लोखंडी खांब उभारण्यात आले होते. छप्पर नसल्याने प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरील चर्चगेटला जाणाऱ्या लोकल गाड्यांच्या शेवटच्या चार डब्यांच्या प्रवाशांना उन्हाळ्यातील उन्हात आणि पावसाळ्यात भिजत उभे राहावे लागत होते. छप्पर नसल्याने प्लॅटफॉर्म वरील प्रवाशांना ट्रेनची वाट पाहत या प्लॅटफॉर्म क्रमांक दोन च्या शेवटी असलेल्या पुलाच्या सावलीत उभे राहावे लागत होते, ट्रेन येताच त्यांना ट्रेनसाठी लांबून प्लॅटफॉर्मवर धाव घ्यावी लागत होती. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या या समस्येचा गांभीर्याने विचार न करता लोकांचे हाल होत होते. प्रवाशांच्या आवश्यक सुविधांबाबत महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे (प.रे.) उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी एडीआरएम अधिकारी सुनील तिवारी यांच्याकडे पावसापूर्वी प्लॅटफॉर्मवर छप्पर बसवून काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली होती, त्यामुळे सद्या या प्लेटफॉर्म चे खांबांवर लोखंडी अँगल लावून छप्पर बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. या छताचा सुविधेमुळे प्रवाशांना उन्हात किंवा पावसात दिलासा मिळेल. प्रशासनाचे आभार मानताना राजेश पंड्या म्हणाले की “देर aye२ दुरुस्त आये” – अखेर प्रवाशांना सुविधांचा न्याय मिळाला, हा महत्त्वाचे मुद्दा आहे.
Good
It is good work should be done at give time