
एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले.
मुंबई : दादर–रत्नागिरी पॅसेंजर गाडी पूर्वीप्रमाणे दादर रेल्वे स्थानकावरून सुरू करण्यात यावी, अशी मागणी कोकण विकास समितीने केली आहे. यासंदर्भात रविवारी (दि. २९ मार्च २०२६) समितीच्या पदाधिकाऱ्यांनी डोंबिवलीचे आमदार व भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट घेतली.
ही भेट स्थानिक नगरसेवक अभिजित सदानंद थरवळ यांच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी, सदानंद थरवळ यांच्या माध्यमातून झाली. यावेळी समितीने दादर–रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत सुरू करणे, कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करणे आणि कोकण वैधानिक विकास महामंडळ स्थापन करणे या प्रमुख मागण्या मांडल्या.
यावर प्रतिक्रिया देताना आमदार रविंद्र चव्हाण यांनी दादर–रत्नागिरी पॅसेंजर संदर्भात प्रवाशांना लवकरच न्याय दिला जाईल, असे आश्वासन दिले. तसेच कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांनी परवानगी दिल्यामुळे अडथळे कमी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गरज भासल्यास महाराष्ट्र व गोवा हद्दीतील मार्ग ताब्यात घेऊन आधुनिकीकरण करण्याचा पर्यायही विचाराधीन असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी जयवंत शंकर दरेकर, अक्षय मधुकर महापदी, शेखर राजाराम पालांडे, संतोष अनंत भोसले, प्रमोद कासारे, अनंत वामन सावंत, अभिषेक जगन्नाथ सुर्वे, सुनील दत्तात्रय नलावडे, संतोष गोरखनाथ घाग, विनायक राणे, प्रसन्न कलमस्टे, सुनील मोरे, राहुल पेडणेकर, प्रताप घाणेकर, विनोद येरुणकर, जनार्दन बाबुराव दळवी आणि कमलेश वसंतराव दळवी आदी उपस्थित होते.
Good
Nice
Good