दादांना चिमुकल्यांनी वाहिली आदरांजली!!

Share

एसएमएस -प्रतिनिधी -सोमा बाबू डे.

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनामालवणीतील सफल विकास वेलफेअर सोसायटी च्या ‘सफल लर्निंग सेंटर’च्या वतीने   विद्यार्थ्यांनी भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. यावेळी विद्यार्थ्यांनी मौन पाळून त्यांना आदरांजली वाहिली.

सफल लर्निंग सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वगुणांचा, राज्याच्या विकासासाठी केलेल्या कार्याचा तसेच शिक्षण क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला. 

या कार्यक्रमास उपस्थित शिक्षकअंजली डे, सोमा डे, व वैशाली महाडिक यांनी सांगितले की, अजितदादा पवार यांचे कार्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांमधून नव्या पिढीला दिशा मिळते. या आदरांजली कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव व कृतज्ञतेची भावना निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत त्यांना पुष्प वाहून आदरांजली अर्पण केली.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *