प्रतिनिधी:सुरेश बोरले
मुंबई,काल पासन दूरचित्रवणीवर एक महत्त्वाची माजी खासदाराची क्लिप व्हायरल होत आहे. जेव्हा जेव्हा ह्या माजी खासदारांनी एका विशिष्ट पक्षावर चिखल फेक केलेली होती, पण ही चिखल फेक करताना, आपला चेहरा आधी आपल्या आरशात पाहायचा होता, शेवटी ज्याच्यावर होणारी टीका किंवा टीका करणारा,हा शेवटी माणूसच आहे. माणूस म्हटलं म्हणजे तो चुकांचा भंडारच असतो. या माजी आमदारांनी कोणाच्या साह्याने कोणा कोणा वर आरोप केले कोणाच्या इशारा केले,हे जन मानसला चांगलं माहित आहे. दुसऱ्याच्या पक्ष हा भ्रष्ट! पैसे खाणारा! आपला पक्ष मात्र धुतलेल्या तांदळा सारखा स्वच्छ. बास्स!या माजी खासदारांनी ज्या ज्या पक्षां वर आरोप केलेले आहेत, ते सगळे सत्य आहेत किंवा नसतीलही, जे आरोप सत्य आहेत ते सत्य आहेत ते नाकारता येत नाहीत. पण अशा वेळेला मांजर जेंव्हा दूध पित असते, तेंव्हा ती नक्की आसपास पाहत असते, आपल्यावर हल्ला तर होत नाही ना? याचा विचार माजी खासदारांनी केला नाही. अति आत्मविश्वास हा खाईत नेतो हा रावणालाही भारी पडला होता.त्यामुळे लंका दहन झाली.अशी अवस्था, त्या माजी खासदारांनी आता झालेली आहे. कारण ज्या पक्षावर त्यांनी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या, त्यामुळे त्यांच्याबद्दल कटूताही आलीच. माजी आमदारांच्या, गटा बरोबर युती झाल्यावर,हेच माजी खासदार अडथळा त्या युती मधे बनले. कारण त्या पक्षाने,ह्या आमदारांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचा अजेंडा पहिला समोर ठेवला!जर हा माजी खासदार असल्यास,युती होणार नाही!हे स्पष्ट केले.म्हणून त्या माजी खासदाराच्या पक्षाने,दुधात पडलेल्या माशी प्रमाणे त्या खासदारांना बाहेर फेकले. याचा राग,त्यांनी नंतर आरोप प्रत्यारोप करत, त्या पक्षावर काढला. हे सत्य आहे लोकाभिमुख आहे. त्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले! त्या प्रकरणात काही आतही गेले.काहिंनवर्ती आरोप सिद्ध व्हायचे आहेत. पण उपरवाले के घरमे देर है अंधेर नही है! ही म्हण खरी आहे. राजकीय स्पर्धा आहे, यात एकमेकांचे हेर पेरलेले असतात किंवा टिपर आहेत, नाहीतर जो ही कामे करतो, त्याचे विरोधकही असतात,ते पण खबरी होऊ शकतात. या ठिकाणी असच कांहीं घडलेले आहे, असा रयतेचा समज पक्का आहे. कारण आरोपी तपासताना, काहीतरी पुरावा,तपासाक स्वतः ठेऊन जातो.अस काहीसं या माजी खासदारा सोबत झालेले दिसतय.काय गोष्टी ह्या वैयक्तिक असतात,त्याच मारक ठरतात. स्त्री ही कुणाच्याही वाट्याला येते,तेंव्हा तिचा व्यवहार हा कुणाला कळणार नाही, असा करायचा असतो . कारण बाई आणि बाटली हा प्रकार राजकारणात नाण्याच्या दोन बाजू सारखा आहे.असे किती तरी किस्से! आरोपांचे घडलेले आहेत. ते असतात खरे!पण शेवटी ते रफा दफा होतात.असल्या गोष्टी लपू शकत नाहीत.आता कसोटी आहे ती माजी आमदारान च्या पक्षाची आहे? कोणती कारवाई त्यांच्यावर होणार? कशी होणार? हे पाहणं आता मजेशीर आहे.पण त्यांच्या कुटुंबातील त्यांची पत्नीही काही आरोप करण्यासाठी पुढे होती. आता आपलाच मालकांची अंडी पिल्ले बाहेर पडत आहेत, त्यांच्यावर समाज विघातक गोष्टी सिद्ध झाल्यास,त्या तक्रार स्वतःच्या धन्याबाबत,ह्या प्रकरणाची करणार का? त्यांचा मुलगा स्थानिक नगरसेवक आहे, जो आपल्या पक्षाला लागलेला कलंक आहे,त्यासाठी आपल्या बापावर कारवाई करेल का? हा प्रश्न जनतेला पडलेले आहे. हे नामदार मोठे मोठे हातोडे घेऊन दुसऱ्यांच्या संपत्तीवर घणाघात करायला जायचे. आता तोच हातोडा जर हे आरोप खरे ठरले, तर आपल्या डोक्यात घालून घेतील का? सांगायचे झाल्यात ते माजी खासदार 1979 बॅच मधले चार्टर्ड अकाउंटंट आहेत व ते अखिल भारतीय क्रमवारी मध्ये आलेले आहेत हे विशेष! मग एवढे हुशार हे महाशय असताना, त्यांनी चांगली कचेरी उघडून,लाखोंच्या आकड्यात खेळायला हवे होते. पैसाही चांगला मिळाला असता.का ह्या राजकरणाच्या चिखलात खेळायच? असे लोकांना वाटते. आपण जर त्यांची माहिती पाहिली,तर बऱ्यापैकी संपत्ती त्यांच्याकडे आहे.फिरत भांडवली चांगला आहे.अंगावर कर्ज हे ते, संपत्तीची मनाने, अल्प आहे. एवढी चांगली स्थिती असताना, कशाला ही नादानी करायची!आपण जेव्हा चिखलात पाय आपटतो,तेव्हा चिखल जोराने समाजावर उडतो. पण शेवटी आपलाही पाय चिखलात जातो. याचा भान त्यांनी ठेवायला पाहिजे होतं. आता तर विरोधकांच्या हाती तर आयात कोलीत मिळालेल आहे. जसं त्यांच्या हातात इतरांचा मिळाला होत तसं! त्या आमदारांनी अनेक आरोप केलेले आहेत ते सत्य होते. त्यामुळे काहीना तुरुंगवास झाला. मग आता यांची पाळी आह?यांच्यावर सुद्धा आरोप सिद्ध झाल्यास,मग सजा काय? हे कुतूहल लोकात आहे. सध्या राष्ट्रीय पक्षाला कोणता कायदा लागू होत नाही? मग तो ई डी. असो आयकर असो, फक्त विरोधी पक्षातील माणसांना लागू आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास, जंतर-मंतरवर! जे महिला पैलवान शारीरिक शोषणा बद्दल बसल्या होत्या, त्या आरोपी खासदाराचे काय झाले? मिळाली त्यांना क्लीन चीट? असे लोकांना वाटते.मग ह्या माजी खासदारांच्या बाबतीत काय? की निर्दोष सुटका? विधान भवनातही दूरचित्रवाणीवर , दाखवताना महिला अध्यक्ष विरोधकांना,ह्या घटने बाबत, थोडक्यात बोला!असे सुचवतात. म्हणजे विरोधकांचे कांड झाल्यास, पक्षाचा बोभाटा व गावभर डंका! आपल्या पक्षाचे घडल्यास,फक्त घरभर करा!एकंदरीत हा प्रकार पाहिल्यावर यामध्ये काहीतरी सत्य असावे, लोकांना दिसत आहे.ते झाकण्याचा प्रयत्न होत आहे.आपलाच पाय जर का, चिखलात असेल,मग दुसऱ्यानवर का चिखल उडवा?सत्ता पक्षातील बोलके बाहुले आता चूप्प आहेत. त्यांत नागपूरकर पण आहेत. आरोप सिद्ध होऊ द्या मग पाहू? मग विरोधकांच्या वेळी, आपण का नाही संयम पाळला.हे माजी आमदार तर नुसते हवेत उडायचे.हातात हतोडे घेऊन फिरायचे. एकेरी शब्दाने समोरच्याला बोलायचे. आता तर माजी आमदार तुझं काय? क्लिप दाखवल्या गेल्या त्यातील काही सत्य असतीलच,या शंका नाही.अस लोकमत आहे. लोकशाहीच्या मताने आता त्या माजी खासदारांनी गप्प राहावे. कारण जेव्हा वेळ स्वतः येते तेव्हा काळत. मग तेव्हा आपल्याला कोणीच वाचवायला येणार नाही.हा दैवाचा नियम आहे. अनेक राजकारणी या दारातून बाहेर गेलेले आहेत. आता कदाचित आता तुमची पाळी! असावी.म्हणून कहते है की, करणी धरणी सब यही पर रह जाती!जाते जाते सब भुगतनी पडती! कर भला तो हो भला! नाहीतर मामला,पलटी होगा.