एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा
दिल्ली बॉम्बेस्फोट प्रकरणाच्या सखोल तपासासाठी १० अधिकाऱ्यांची विशेष टीम स्थापन करण्यात आली असून, तपासाची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. या विशेष तपास पथकाचे नेतृत्व एडीजी विजय साखरे करतील.
टीममध्ये एक आयजी-स्तरीय अधिकारी, दोन डीआयजी, तीन एसपी, तसेच डीएसपी-स्तरीय अधिकारी यांचा समावेश आहे.
तसेच दिल्ली पोलिस अधिकारी देखील एनआयएला तपासामध्ये आवश्यक ती मदत करत आहेत.
संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, एनआयए पथक घटनास्थळी जमा झालेल्या पुराव्यांचे वैज्ञानिक विश्लेषण करत असून, स्फोटासाठी वापरलेल्या पदार्थांबाबत फॉरेन्सिक तपास सुरू आहे.
Very good
Good