दोन बाळांच्या आईला मद्यधुंद चालकाने चिरडले!

Share

फोटो :मृतक शहाना पती आणि मुला सह

प्रतिनिधी :वैशाली महाडिक :मुंबई,मालाड-पश्चिम,गुडिया पाडा ऑरीस टॉवर येथे मध्य रात्री 2 वाजताच्या सुमारास  एका महिलेला कार ने चिरडले गाडी चालकाने या महिलेला फारफटत दुभाजका पर्यंत नेले होते त्यात ती महिला गंभीर जख्मी झाली होती रुग्णालयात नेल्यावर मृत घोषित करण्यात आली . गुडिया पाड्यातील उच्चभू ऑरीस  टॉवर एक मधील अनुप सिन्हावय 45वर्ष याच्या कार ने  शहाना जावेद काझी या 27 वर्षीय  महिलेला  चिरडलं व दुभाजका पर्यंत खेचत नेलं. अपघातात शहाना काझी या दोन मुलांच्या आईचा  मृत्यू झाला आहे.घटने नंतर  जमा झालेल्या लोकांनी  कार चालक अनुप सिन्हा याला पकडून  चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र मुजोर कार चालकअनुप सिन्हा रहिवाशांना पैशांची मगरुरी दाखवत पाच मिनिटात पैशाच्या जोरावर सुटून येईन तुम्ही माझं काहीच करू शकत नाही असं असं धमाकावत होता.या विरोधात स्थानिकांनी  एकत्र येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता . पोलीस घटनेचा तपास करत आहे. मात्र परिसरात  तणावाचा वातावरण आहे. या घटने नंतर  परिसरात हळ हळ व्यक्त होत आहे.मृतक शहाना काझी पश्चात  पती जावेद आणि 4 वर्षीय मुलगी उमामा व 7 वर्षीय मुलगा जैद आहे या घटने नंतर स्थानिकांनी सिसिटीव्ही बसवण्याची व सुरक्षेची मागणी शासनाकडे केली आहे.तसेच चालकाने घटनेच्या वेळी मध धुंद असल्याचे वैद्यकीय चाचणीत निष्पण झाल्याची माहिती पोलिसां कडून मिळाली आहे.

आरोपी कार चालक अनुप सिन्हा


Share

One thought on “दोन बाळांच्या आईला मद्यधुंद चालकाने चिरडले!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *