एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक
मुंबई : महाराष्ट्र सरकार प्रस्तावित करत असलेल्या “धर्म स्वतंत्रता विधेयक 2025” वरून राज्यात वाद वाढला आहे. सरकारचे म्हणणे आहे की हा कायदा जबरदस्ती, फसवणूक किंवा प्रलोभनाद्वारे होणारे धर्मांतरण रोखण्यासाठी आहे. मात्र बॉम्बे कॅथोलिक सभा (BCS) आणि अल्पसंख्याक संघटनांनी त्याला संविधानातील अनुच्छेद 25 अंतर्गत धार्मिक स्वातंत्र्यावर आघात असल्याचे म्हटले आहे.
बॉम्बे कॅथलीक सभे ने मालाड सह मुंबईतील ३५ पॅरिशमध्ये शांततापूर्ण आंदोलन केले असून डॉल्फी डी’सूझा यांनी हा कायदा “भ्रामक आणि अल्पसंख्याकांना लक्ष्य करणारा” असल्याचा आरोप केला. धार्मिक नेते रेव्ह. डॉमिनिक साविओ फर्नांडिस यांनी या कायद्यामुळे शैक्षणिक, आरोग्य आणि समाजसेवा उपक्रमांवर परिणाम होऊ शकतो असे मत व्यक्त केले.
३० नोव्हेंबर रोजी बांद्रा येथे जागरूकता सेमिनार आयोजित असून पुढील विरोधाची घोषणा होऊ शकते. हा कायदा मंजूर झाल्यास महाराष्ट्र भारतातील ११वे असे राज्य ठरेल.
to create awareness of the darkside of the intended legislation is need of the house.
Congratulations to the Bombay Catholic Sabha for spearheading this awareness campaign.
Govt should consider
वांद्रे येथे आज ३० नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या जागरूकता सेमिनार कडे सर्वांचे लक्ष लागले आहे हे नक्कीच…
Sad butreality