
एसएमएस -प्रतिनिधी -सोमा बाबू डे
मुंबई : मालाड पश्चिमेतील मालवणी गेट क्रमांक ५ परिसरात रस्त्यावरील दुभाजक कोसळल्याने व दुसरा दुभाजकही पडण्याच्या स्थितीत आल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मालवणी पोलीस ठाण्यासमोरील शहीद अब्दुल हमीद रस्त्यावर हा दुभाजक असून या मार्गावर दोन्ही बाजूंनी प्रचंड वाहतूक असते.
वेगाने येणाऱ्या वाहनांवर हा दुभाजक कोसळल्यास गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पादचारी रस्ता ओलांडत असल्याने दुभाजक पायावर पडून दुखापत होण्याचाही धोका आहे.
परिसरातील नागरिकांनी व वाहनचालकांनी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली असून, पालिकेने तत्काळ दुभाजकाची दुरुस्ती करून संभाव्य दुर्घटना टाळाव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.
मालवणीमधील गेट क्रमांक ५ जवळील रस्त्यावर खाली कोसळलेल्या अवस्थेत असलेले हे दुभाजक अत्यंत धोकादायक व जीवघेणे ठरत असून यामुळे वाहनचालकांना उलटफेर (यू टर्न) घेताना जीव मुठीत धरून किंवा अपघाताला सामोरे जाऊन रस्ता ओलांडावा लागतो.अशात मालवणी पोलीस ठाणे तसेच माजी मंत्री तथा ४ वेळा आमदार पद भूषवलेले श्रीमान. अस्लम शेख यांचे जनसंपर्क कार्यालय असून किंवा योग्य सहकार्य न मिळत असल्याने स्थानिक वाहनचालक तथा नागरिकांना असा हलाखीचा प्रवास करून घर गाठावे लागते.त्यामुळे कामासाठी वाहन घेऊन किंवा चालत जाणारे नागरिक संध्याकाळी पुन्हा व्यवस्थित घरी येतील की नाही याची देखील काळजी लागलेली असते.अशा धोकादायक समस्यांकडे स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र ढुंकून देखील न बघता उलट गांभीर्याने पाहत नाही हेच जनतेचं दुर्दैव म्हणावं लागेल.
त्रस्त नागरिक…
Aysi special spot pr aysi image asa nhi karte.
Bmc अस कस चालणार??
आज घरा घरात दुचाकी वाहन जाली आहेत हे लोग कधिच वहान सावकाच चालवत नाही सर्व कायदे धाब्यावर बसवतात आणि अपघात होतत तयानंतरच सरकारी लोग जागे होतात आपण स्वताच आपली सुरक्षा करा