नंदादीप विद्यालयात ‘अभिनव शिक्षण महोत्सव’ उत्साहात संपन्न.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक

कौशल्य विकासावर आधारित उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास, सर्जनशीलता आणि उद्योजकीय दृष्टिकोन रुजावा या उद्देशाने नंदादीप विद्यालयात दिनांक १९ व २० डिसेंबर २०२५ रोजी दोन दिवसीय ‘अभिनव शिक्षण महोत्सव’ उत्साहात पार पडला.
या महोत्सवात विद्यार्थ्यांनी केवळ आपली कला सादर न करता प्रत्यक्ष व्यावसायिक अनुभवही घेतला. लिप्पन आर्ट, मंडला आर्ट, ओरिगामी, वारली चित्रकला तसेच टाकाऊतून टिकाऊ वस्तू अशा विविध कलाविष्कारांनी महोत्सवात रंगत आणली. पूर्व-प्राथमिक ते माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.
महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कागदी पिशव्या, चॉकलेट्स व विविध खाद्यपदार्थांची विक्री. यामधून ‘कमावा आणि शिका’ या संकल्पनेचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला. इयत्ता ८ वी ‘ब’ च्या विद्यार्थ्यांनी उभारलेल्या खाद्य स्टॉलने सुमारे ५ हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळवून यशस्वी व्यावसायिक व्यवस्थापनाचे उदाहरण सादर केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला असून आत्मविश्वास, संघभावना आणि आर्थिक साक्षरता वाढीस लागल्याचे चित्र दिसून आले. महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. शिक्षक, पालक आणि नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.
शालेय शिक्षणाला व्यवहाराशी जोडणारा आणि विद्यार्थ्यांना भविष्यातील व्यावसायिक जगाची तोंडओळख करून देणारा हा महोत्सव आदर्श ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


Share

2 thoughts on “नंदादीप विद्यालयात ‘अभिनव शिक्षण महोत्सव’ उत्साहात संपन्न.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *