मुंबई- कांदिवली येथील शालिनी सभागृहात दि 1 जून रोजी,नवनिर्माण समाज विकास केंद्र या सामाजिक संस्थेचा 26 वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला. यावेळी अभिनेता, दिग्दर्शक, लेखक, कवी राजेश देशपांडे, दीप अर्चनचे संस्थापक संदीप नेमनेकर, आयस्याब्स संस्थेच्या सदस्या सुषमा शर्मा, तृतीयपंथी चंदना, अल्ताफ यांची प्रमुख उपस्थिती होती. नवनिर्माण चे संस्थापक श्रीधर क्षीरसागर, विश्वस्त मनोहर राजगुरू, संचालिका सुषमा खिल्लारे यांचीही मंचावर उपस्थिती होती. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व फतिमा शेख यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. 26 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत वेगवेगळया सामाजिक प्रश्नांवर केलेल्या यशस्वी वाटचालीवर आधारित चित्रफीत दाखविण्यात आली. सर्वच वक्त्यांनी संस्थेच्या कामाचा गौरव केला. यावेळी राजेश देशपांडे यांनी सदिच्छा देत संस्थेच्या कामाचा गौरव केला. सुषमा शर्मा यांनी आपण सतत कार्यरत राहिले पाहिजे. पुढे पुढे आपले कार्य अधिक गतिमान केले पाहिजे असे सांगितले. तर संदीप नेमनेकर म्हणाले की अजून खूप सामाजिक प्रश्न आहेत याकरिता संघर्ष करावाच लागेल. असे सूचक उदगार काढले. नवनिर्माण संस्थेचे संस्थापक श्रीधर क्षीरसागर म्हणाले की संस्थेचे कार्यकर्ते स्वतःमध्ये शैक्षणिक प्रगती करीत आहेत त्याच बरोबर संस्थेच्या ध्येय धोरणानूरुप कार्यरत आहेत ही अत्यंत महत्वाची बाब आहे. सभागृह पूर्ण भरले होते. यावेळी कोविड काळात झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना मदतीचा हात देणाऱ्या व्यक्तींचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. राष्ट्रीय एकता दर्शविणारी वेशभूषा करून प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा कांबळे यांनी केले.