एसएससमाचार -प्रतिनिधी -सुरेश बोर्ले.
मुंबई :एक सच्चा, प्रामाणिक आणि निर्भीड नेता म्हणून ओळखले जाणारे बच्चू कडू यांचे कोणत्याही पक्षात कधी जुळले नाही. त्यामुळेच त्यांनी “प्रहार” ही स्वतंत्र संघटना स्थापन केली.
सध्या ही संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठामपणे उभी आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मिळालेली तुटपुंजी मदत, झालेला प्रचंड विलंब आणि अन्य समस्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे.
सरकारकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नसल्याने, या अन्यायाविरोधात मा. बच्चू कडू यांनी आता एल्गार पुकारला आहे!
या आंदोलनासाठी “प्रहार” संघटनेचे कार्यकर्ते २८ ऑक्टोबर २०२५ रोजी नागपूरकडे मोर्चा घेऊन धडकणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सरकारला जाब विचारणार आहेत.
या भूमिकेमुळे तमाम शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लाट उसळली असून, बळीराजा बच्चू कडू यांना मोठा पाठिंबा देत आहे.
Good
” आपना भिडू, बच्चु कडू ” अशा म्हणीनं ओळखले जाणारे प्रामाणिक पुढारी म्हणजे बच्चू भाऊ कडू गेल्या विधान सभेला निवडून आले नसले तरी त्यांचा स्वकमाईचा रुबाब सध्याच्या आमदारापेक्षा काही कमी नाही.शेतकरी वर्गाला नेहमीच त्यांची साथ लाभेल हे मात्र नक्कीच…
Right