प्रतिनिधी : सुरेश बोर्ले
मुंबई : शिंदे जेव्हा मुख्यमंत्री बनले,त्याच वेळेला स्व.आनंद दिघेंचा सिनेमा हा त्यांनी सिनेगृहात आणला.
प्रत्येकवेळी दिघेंच्या तोंडून “एकनाथ”कुठे आहे?हा शब्द असायचा!आज चार दिवस झाले,मराठा आंदोलक नेते आझाद मैदानात उपोषण करीत आहेत.१८महिन्यापूर्वी ह्याच नाथांनी,छत्रपतींच्या प्रतिमेला साक्षी ठेवून!मराठा आंदोलकांना वेळ मारून नेण्यासाठी,मोठी मोठी आरक्षणाची आश्वासन दिली.मग ती गेली कुठे?का अस ह्या मराठा समाजाशी खोटं नाट खेळायचं,तुमच्या भरोष्यावरच हा समाज त्यावेळेला आपल्या घरी मोठ्या अपेक्षा घेऊन गेला की नाही!शिंदेंचा शब्द हा महाराजांसमोर दिलेला शब्द तो खोटा ठरला व आरक्षणाला त्यांनी पाने पुसली.आज पुन्हा मराठा मुंबईत अवतरला! तो आता तुम्हाला सोडणार नाही. भाजपाने ठाणेकराला बहुतेक बळीचा बकरा त्यावेळी बनवला होता,हे निश्चित!पण ते इतके दुधखुले पण नाहीत.ते स्वतः मराठा आहेत.मग त्यांनी असा खेळ का ह्या जनते बरोबर खेळावा?हा मोठा प्रश्न आहे? आज त्यांचीच नाचक्की झाली आहे.हे त्यांनाही समजलेलं आहे!म्हणून ते कुठेही दिसत नाहीत, कुठेही भाष्य करीत नाहीत. गणपती निमित्ताने गावी जात आहेत.आता मराठा आज व आम जनता विचारते आहे!की नाथांचा नाथ “एकनाथ”
कुठे आहे?
Good
आता दिसत नाहीत
लोकप्रिय आणि उत्साही मात्र मुसद्दी नाही