
एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा
नाशिकमधील देवळाली येथे आयोजित संवाद मेळाव्यात युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी सविस्तर संवाद साधला. यावेळी त्यांनी नाशिकमधील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तीव्र टीका करत, “नाशिकमध्ये भाजपने जणू रावणराज आणून ठेवलं आहे. सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आता मशाल हाती घेऊन राजकारणातील या रावणरूपी वृत्तीला जाळून खाक करावंच लागेल,” असा निर्धार व्यक्त केला.
आदित्य ठाकरे म्हणाले की, नाशिककरांच्या मूलभूत प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष नाशिकच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदैव तत्पर राहील. शहराच्या विकासासाठी आणि जनतेच्या हक्कांसाठी संघर्ष सुरूच राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या संवाद मेळाव्यास खासदार राजाभाऊ वाजे, माजी आमदार वसंत गीते, महानगरप्रमुख प्रथमेश गीते यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Ohh हवा बदल होत आहे का?