निवृत्त कर्मचाऱ्यांना धक्का!

Share

प्रतिनिधी :सुरेश बोर्ले

मुंबई :महागाई भत्ता आणि वेतन आयोगाचा लाभ बंद!!
आतापासून निवृत्त कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (डीए) आणि वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही..नवीन कायद्यानुसार, सरकार त्यांच्या नियमित पगारवाढीची जबाबदारी घेणार नाही.

भारतीय संसदेच्या नुकत्याच संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर झालेल्या वित्त कायदा 2025 नुसार, देशातील लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. आता पासून निवृत्त कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (डीए) आणि वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही. नवीन कायद्यानुसार, सरकार त्यांच्या नियमित पगारवाढीची जबाबदारी घेणार नाही.

वित्त कायदा 2025 नंतर मागील नियमांमध्ये बदल

दर सहा महिन्यांनी महागाई भत्ता (डीए) वाढ आता लागू होणार नाही

1982 मध्ये मुख्य न्यायाधीश यशवंतराव चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने दिलेल्या ऐतिहासिक निकालानंतर निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी वेतन आयोग आणि डीए लागू करण्यात आला. त्याच निर्णयामुळे 17 डिसेंबर रोजी पेन्शनर डे साजरा केला जातो.

या कायदया नुसार आतापासून पुढे वेतन आयोग लागू होणार नाही: निवृत्त कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही.

पेन्शन कायदा 1972 लागू नाही: म्हणून, जुन्या कायद्यांतर्गत उपलब्ध असलेल्या सुविधांचा आधार संपला आहे.

निर्णयाच्या तारखेपासून वेतनवाढ प्रभावी: मागील कालावधीची कोणतीही थकबाकी किंवा देणी दिली जाणार नाहीत.

न्यायालयात अपील नाही: नवीन कायद्यात दिलेले नियम अंतिम मानले जातील.

वित्त कायदा च्या नवीन तरतुदींमुळे लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांची भविष्यातील आर्थिक स्थिती धोक्यात आली आहे. ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सरकारी सेवेत समर्पित केले आहे त्यांना आता त्यांच्या खर्चाचा भार स्वतः उचलावा लागेल. वेतन आयोग आणि महागाई भत्ता नसल्यामुळे, वाढत्या महागाईच्या युगात निवृत्त कर्मचाऱ्यांना जगणे आणखी कठीण होईल.


Share

4 thoughts on “निवृत्त कर्मचाऱ्यांना धक्का!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *