
एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा
मुंबई : मुंबई पोलीस दलातून निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त रेहाना गफूर शेख यांनी आज मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात अधिकृत प्रवेश केला. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते व सचिव खासदार अनिल देसाई, विभागप्रमुख संतोष शिंदे तसेच विभागसंघटक युगंधरा साळेकर उपस्थित होते.
प्रशासनातील दीर्घ अनुभव व सामाजिक बांधिलकीच्या जोरावर रेहाना गफूर शेख यांचा शिवसेनेत प्रवेश हा पक्षासाठी बळकटी देणारा ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
Ohh पोलिसी ते नेतागिरी