प्रतिनिधी : सुरेश बोर्ले
जगात शतकानू शतके जगात आंदोलने सुरू होती आणि सुरू आहेतही. काहीं महत्वाच्या आंदोलने पाहायची झाली तर!१९३२ साली मँचेस्टर मधील कामगार आंदोलन,रशिया राजवट आंदोलन,चीन मधील त्यानंमन चौकातील सरकार विरोधी आंदोलन,जर्मनीतील हिटलर विरोधी आंदोलन,
नुकताच श्रीलंका व बांगलादेशमध्ये झालेली आंदोलने!ही सगळी आंदोलने मग क्रांतिकारी बदलात रूपांतरित होतात.पण कायापालट हा होतोच. हिंदुस्थानाची ब्रिटिश विरोधी झालेली आंदोलने मग त्याची झालेली क्रांती! मिळालेलं स्वातंत्र्य हे फळीत आहे.म्हणजेच
आंदोलन+क्रांती+अत्याचार मग क्रांती.हे गमकच आहे किंवा समीकरण आहे.नुकतीच नेपाळमध्ये सामाजिक माध्यमाविरोधात झालेलं आंदोलन!नेपाळ सरकारने,
भ्रमणध्वनी माध्यमानवर काही वापरीत घटकांवर अचानक बंदी घातली.त्यामध्ये व्हाटसअप, फेसबुक, गुगल सारखी अनेक महत्वाची घटके जी रोज वापरताना तरुण वर्ग दिसतो. जगातील तरुण हा भ्रमणध्वनीच्या आहारी गेलेला आहे.कारण हा अनेक प्रकारे उपयोगी आहे.पण त्यावर असलेली करमणूक ही सगळ्यांना आकर्षित करते,त्याला नेपाळी तरुण अपवाद नाही.अचानक सरकारने आणलेल्या ह्या बंदीने,तरुण त्याविरोधात रस्त्यावर उतरला आणि संपूर्ण देशभर ही आंदोलन पसरले. त्यात सरकारी इमारतीनवर तरुण आरूढ झाले!पोलिसांत त्यांच्यात चकमकी झाल्या,त्यात कांहीं तरुण मृत्युमुखी पडले. कांहीं मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला.शेवटी सरकारला माध्यमांवरची निरबंध काढावे लागले.आता तेथील परिस्थिती नियंत्रितआहे.पण आंदोलन व क्रांतीशिवाय जनतेला यश येत नाही हे खर आहे.
आंदोलन लोकशाही मार्गाने असावे हिंसक नसावे
Right but democratic way peaceful protest