
प्रतिनिधी :उत्कर्ष बोर्ले
|| टाळ वाजे||
|| मृदंग वाजे ||
|| वाजे हरीचा विना ||
|| माऊली निघाले पंढरपुरी||
|| मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला ||
!! जय जय राम कृष्ण हरी !
आषाढी एकादशी निमित्त दिनांक ५/०७/२०२५ शनिवार रोजी म.वि.वि. मंडळ संचलित शां. कृ. पंत वालावलकर शाळा कुर्ला पूर्व येथील विद्यार्थ्यांनी नेहरूनगर कुर्ला येथे पायी दिंडी सोहळा आयोजित केला होता.यावेळी शाळेचे सचिव सत्येंद्र सावंत, कुर्ला नेहरूनगर च्या नगरसेविका श्रीमती मोरजकर मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण भोये उपमुख्याध्यापिका कावेरी मांढरे, ज्येष्ठ शिक्षिका हेमांगिनी काटकर तसेच शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने दिंडीत सहभाग घेतला.या शाळेत वर्षभर विविध सण उत्सव आणि महत्वाचे दिवस मोठ्या आनंदात साजरे केले जातात.

