
नवी मुंबई : आदर्श रायगड वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या ४थ्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी अंबरनाथ येथील अंबर रोटरी भवन येथे भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी पत्रकारिता क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीसाठी मुंबई येथील पूनम पाटगावे तसेच नवी मुंबई येथील वैभव पाटील आदर्श पत्रकार या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच आदर्श सामाजिक संस्था म्हणून जॉय ऑफ गिव्हिंग या संस्थेला पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष गणेश हिरवे व इतर सदस्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी व्यासपीठावर राजकीय क्षेत्रातील मान्यवरांबरोबरच वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते. मराठी वृत्तपत्रांसाठी सध्याच्या संघर्षमय वातावरणात देखील गेली चार वर्षे अविरतपणे निष्पक्ष वृत्तीने वृत्तपत्र चालवण्याची किमया करणाऱ्या आदर्श रायगडच्या टीमचे उपस्थितांनी कौतुक केले. समाजातील विविध क्षेत्रातील रत्नांचा राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मान करण्याचा उपक्रम स्तुत्य असून यातून वृत्तपत्रीय प्रबोधनाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपली जात असून यातून समाजातील चांगल्या व्यक्तींना प्रोत्साहनदेखील मिळत आहे. जॉय चे असुंता डिसोझा, योगिता हिरवे, चंद्रशेखर सावंत यांना देखील पुरस्कार जाहीर करण्यात आले होते.याप्रसंगी वृत्तपत्राचे मुख्य संपादक रमेश सणस, कार्यकारी संपादक शैलेश सणस तसेच उपसंपादक अविनाश म्हात्रे यांच्या कार्याचे कौतुक करत सर्वच सत्कारमूर्तींनी आदर्श रायगडच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Good. Congratulations
Congrats