पावसाचा परिणाम बळीराजावर!!

Share

प्रतिनिधी : सुरेश बोर्ले

पावसाची परतण्याची शेवटची रिमझिम ही महाराष्ट्राला जिव्हारी चटका लावून गेली.राज्यातील अनेक ठिकाणी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. साधारणपणे सत्तर हजार एकर हून अधिक शेती ही पाण्याखाली गेली असून,त्यामध्ये सोयाबीन,कापूस, ऊस व इतर महत्वाच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यामुळे अन्नदाता हा आर्थिक संकटात सापडलेला आहे. सरकारकडून मदतीच्या अपेक्षेत आहे.तर सध्या मा.अजित पवार उपमुख्य मंत्री हे सोलापूर हे दौऱ्यावर आहेत.तर मंत्री पंकजा मुंडे ह्या जालना जिल्ह्याचा आढावा घेत आहेत.
त्यावेळी दोघांनी नुकसान आढावयासहीत सरकारी नुकसान भरपाई देण्याचे
आश्वासन त्यांनी दिलेले आहे. तर आज मुख्यमंत्री
मा.देवेंद्र फडणवीस ही आज अनेक जिल्ह्यांची पाहणी करणार आहेत.पण आमचा बळीराजा संकटात आहे, हे निश्चित!


Share

3 thoughts on “पावसाचा परिणाम बळीराजावर!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *