
प्रतिनिधी:सुरेश बोरले
गेल्या अनेक महिन्यांपासून चालू असलेली हिंदुस्थानातील,सगळ्यात मोठी स्पर्धा! प्रो-कबड्डी २४ चे हे १० वे वर्ष आणि ह्या कबड्डी सामन्यात “पुणेरी पलटण”ह्या संघाने,संपूर्ण साखळी स्पर्धेत फक्त दोनच सामने गमावले.आपल्या अदबुत व परंपरागत खेळाच्या जोरावर, अंतिम सामन्यात धडक दिली.अंतिम सामन्यात ह्या संघाचा सामना,भारताचे माजी खेळाडू व आत्ता प्रशिक्षक!श्री,मनजीत सिंह ह्यांच्या हरयाणा स्टीलरस ह्या दोघांत झाला. स्टी लर्स हा संघ अथक मेहनतीने अंतिम फेरीत पोहोचल्यावर, पुणेरी संघाशी एकाकी शेवट पर्यंत लढला.सुरवातीला एक एक गुणांची कुरघोडी दोन्ही संघांनी एकमेकांना बरोबर केली.परंतु पलटनच्या पंकज मिहितेने, अचानक एका चढाईत ४ गुण वसूल केले.त्यावेळेस, पु. प.९ व ह. स्टी.७ गुणांवर होते मग १३ गुणाच्या नंतर मात्र पुण्याने गुण वसुलीचा सपाटाच सर्वांगीण खेळ करुन लावला.त्यामध्ये मोहित गोयतनेही ४ गुणाची भर टाकली.तर उजवा कोपरा गौरव खत्री व डावा कोपरा इरानियन खेळाडू सादलू आणि कप्तान अस्लम इनामदार ह्याच कल्पक नेतृत्व व चढाया ह्यांच्या जोरावर ह अटी तटीचा सामना २८-२५ अशा ३ गुणाच्या फरकाने जिंकला.तर स्टीलर्सच्या पंकज,दिनेश,विनय ह्यांचे प्रयत्न,पल्टनपुढे अधूरे पडले.पुणेरी पलटण हा संघ प्रशिक्षक बी. सी.रमेश व कप्तान अस्लम इनामदार यांनी चांगलाच,संघ भावनेने बांधला होता.
अभिनंदन