पंजाब पोलिसांनी अटक केलेल्या महाराष्ट्राचे प्रसिद्ध पैलवान सिकंदर शेख याला न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे. या निर्णयानंतर त्याच्या कुटुंबीयांसह समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिकंदरची बाजू न्यायालयात प्रभावीपणे मांडणाऱ्या वकिलांचे तसेच पंजाब सरकारकडून सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांचे विशेष आभार मानण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणात विविध स्तरांवर प्रयत्न करून मदत करणाऱ्यांनाही कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे.
सिकंदरविरोधातील खटला अद्याप न्यायालयात सुरु असून, “तो निर्दोष आहे आणि न्यायालयातून त्याचे निर्दोषत्व सिद्ध होईल,” असा विश्वास त्याच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र साठी Greatबातमी
सत्य कधिच लपत नाही उशिराने का नाहि पण विजय हणोरच हेच खर
Good