पोईसर नदीचे पाणी शिरले घरात….

Share

प्रतिनिधी : उत्कर्ष बोर्ले

मुंबई : कांदिवली पश्चिमेतील पोईसर होली क्रॉस रोड जलमय झाले.या वस्तीतील घरात पावसाचे आणि लगत च्या पोईसर नदी सद्या नाला म्हणून ओळखली जाते तीचे पाणी शिरल्याने रहिवाशी हतबल झाले. आपत्ती व्यवस्थापन (डिसास्टर मॅनेजमेंट ) काय करीत आहे कोणते मॅनेजमेंट करत आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया रहिवासी अजित पाटील यांनी दिली आहे. त्यांचे म्हणणे आहे की आमच्या घरात पाणी शिरले या बाबत पावसाळा सुरु होण्या आधी पासून आम्ही पालिकेला उपाययोजना करण्याची माहिती दिली होती परंतु नेहमी प्रमाणे पालिके कडून दुर्लक्ष झाले आणि आमच्या घरात शेजाऱ च्या पोईसर नदी सद्या पोईसर नाला म्हणून ओळखली जाते ही पावसाच्या पाण्याने भरून ओसांडून लागली आणि तिचे पाणी आमच्या वस्तीत शिरल्याने आमच्या घरात ही पाणी भरले या वस्तीकडे पालिके चे दुर्लक्ष होत आहे. आमच्या घरात वस्तीत पाणी भरले पण आपत्ती व्यवस्थापन खाते काय करत आहे? असा प्रश्न येथील रहिवाशांना पडला आहे.


Share

4 thoughts on “पोईसर नदीचे पाणी शिरले घरात….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *