
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई , राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत अल्प वेतनावर काम करणाऱ्या, लहान मुलांना पोषण आहार पुरविणाऱ्या या सामान्य महिला नसून योद्धा आहेत. एकात्मिक बालविकास प्रकल्पतर्फे अंधेरी पश्चिम येथील पोषण माहच्या समारोप समारंभात आयआरएस अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी व्यक्त केली भावना.

अंधेरी पश्चिम येथे पोषण अभियान राबविण्यात आले, त्याचा समारोप समारंभ अंधेरी पश्चिम येथील संतोषी माता मंदिर हॉलमध्ये पार पडला. कार्यक्रमाला आयआरएस अधिकारी समीर वानखेडे व वडार समाजाचे मुंबई अध्यक्ष बाबण्णा कुशाळकर प्रामुख्याने अतिथी म्हणून उपस्थित होते. पाचव्या राष्ट्रीय पोषण महिन्याच्या समारोप कार्यक्रमात बापूराव भवाने, डॉ. विणा शिंदे, श्रीकांत कुलकर्णी, महेंद्र चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते मनोज व्यास, मुख्य कार्यकर्त्या नसीमा काजी आदी उपस्थित होते.