
एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले
मुंबई : मालाड पश्चिमेतील राठोडी येथील प्रतीक्षा अरुण विश्वकर्मा हिने पुण्यात झालेल्या जिल्हा स्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धा 2025-2026 मध्ये 17 वर्ष वय व 58 किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावून अभिमानास्पद यश मिळवले आहे.तसेच तिची राज्यस्तरीय स्पर्धे साठी निवड करण्यात आली आहे.
प्रतीक्षा ही मालवणी चर्चजवळील सेंट एंथोनी स्कूलची विद्यार्थीनी असून, क्रीड़ा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र, जिल्हा क्रीड़ा अधिकारी कार्यालय पुणे आणि कराटे डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
तिला राष्ट्रीय रेफरी व कोच ब्लॅक बेल्ट 4 डॅन अकबर अली यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. प्रतीक्षाच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून, तिने आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक, शाळेतील शिक्षक तसेच आई-वडिलांना देत पुढील काळातही आणखी उच्च शिखर सर करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
Congrats!
” कु. प्रतीक्षाला आमचे मानाचे त्रिवार वंदन ”
नावात ‘ प्रतीक्षा ‘ असलं तरी अचानक आलेल्या अपयशाला पुरती गवसणी घालून तू या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलास व योग्य यश मिळवून मालवणी सारख्या गजबजलेल्या परिसरातून तसेच ‘ सेंट एंथोनी ‘ चं नाव लौकिक केलस अशात खरंतर तुझ्या खऱ्या हिंमतीला दाद द्यायला हवी. म्हणूनच तुझं अभिनंदन ” कु. प्रतीक्षा विश्वकर्मा ” यशवंत हो, गुणवंत हो, कीर्तीवंत हो, तसेच तुला पुढील वाटचालीसाठी आमच्या लक्ष,लक्ष शुभेच्छा!…
धन्यवाद!…