प्रभाकर नारकर जनता दलाचे प्रदेश कार्याध्यक्ष..

Share

एसएमएस -प्रतिनिधी-उत्कर्ष बोर्ले

मुंबई : जनता दल सेक्युलर महाराष्ट्र पक्षाच्या कार्याध्यक्षपदी प्रभाकर नारकर यांची निवड करण्यात आली असून त्याचबरोबर प्रधान महासचिव या पदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोडविण्यात आली आहे. 

      मूळचे पत्रकार असलेल्या प्रभाकर नारकर यांनी नोकरी सोडून जनता दलात प्रवेश केला होता. गेली अनेक वर्षे मुंबई जनता दलाचे अध्यक्ष म्हणून ते जबाबदारी सांभाळत होते. मात्र पक्षाचे प्रधान महासचिव अझमल खान यांच्या निधनामुळे हे पद बराच काळ रिक्त होते. त्यामुळे पक्षाच्या कामकाजातही विस्कळीतपणा आला होता. त्यामुळे त्यांनी ही जबाबदारी स्वीकारावी यासाठी पक्षाकडून त्यांच्याकडे आग्रह धरण्यात येत होता. 

या पार्श्वभूमीवर त्यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्याबरोबरच प्रधान महासचिव पदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी घेतला आहे. 

     प्रभाकर नारकर यांच्या जागेवर मुंबई जनता दलाचे अध्यक्ष म्हणून सुरेंद्रकुमार वाजपेयी यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ज्येष्ठ कार्यकर्ते सलीम भाटी यांची प्रभारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.


Share

One thought on “प्रभाकर नारकर जनता दलाचे प्रदेश कार्याध्यक्ष..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *