
प्रतिनिधी : सुरेश बोर्ले
अंधेरी पूर्व येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा क्रमांक ८४ तर्फे आज नेस्को येथे आयोजित मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शन मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविण्यात आली.
या मेळाव्यास शाखेच्या महिला उपविभाग प्रमुख मा. रेश्मा घाग, शाखाध्यक्ष श्री. मनोज शेलार, सौ. पूजा गायकवाड, मा. वल्लभ मोरे तसेच शाखेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उत्साहात सहभागी झाले.
कार्यकर्त्यांचा जोश आणि उत्साह पाहून मेळाव्याचे वातावरण ‘राजसाहेबांचा जयजयकार’ घोषणांनी दुमदुमून गेले.
Good
छान