प्रसिद्ध ‘तारपा’ वादक भिकल्या धिंनडा यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -सुरेश बोर्ले.

मुंबई : भारतातील आदिवासी समाज दीर्घकाळापासून सामाजिक-आर्थिकदृष्ट्या मागास अवस्थेत राहिला आहे. मात्र शिक्षणाचा प्रसार आणि शासनाच्या विविध योजनांमुळे ही परिस्थिती हळूहळू बदलत असून, विशेषतः आदिवासी व इतर वंचित घटकांतील तरुण आज स्वतःच्या पायावर उभे राहत आहेत.
महाराष्ट्रात ठाणे, रायगड, पालघर ते थेट तलासरीपर्यंत आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात विखुरलेला आहे. या समाजाने स्वातंत्र्यलढ्यातही मोलाचे योगदान दिले असून, स्वातंत्र्यसैनिक स्व. वीर बिरसा मुंडा यांचे बलिदान आजही स्मरणात आहे.
या आदिवासी समाजाचे तारपा (तारफा) नृत्य अत्यंत लोकप्रिय आहे. या नृत्यात वापरले जाणारे तारपा हे वाद्य जनावराच्या शिंगापासून विशिष्ट पद्धतीने तयार केले जाते. ते वाजवण्यासाठी विशेष ताकद, दमसास आणि कौशल्य लागते. दुर्दैवाने, काळाच्या ओघात हे दुर्मिळ वाद्य आणि ते वाजवणारे कलाकार कमी होत चालले आहेत.
अशा परिस्थितीत पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय तारपा वादक भिकल्या धिंनडा यांना ७७व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत सरकारकडून ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाल्याने आदिवासी समाजात आनंदाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे, आदिवासी समाजातील पद्मश्री पुरस्कार मिळवणारे ते पहिले नागरिक ठरले आहेत.
हा मानाचा पुरस्कार लवकरच भारताच्या राष्ट्रपती मा. द्रौपदी मुरमु यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात प्रदान करण्यात येणार आहे.
ही गौरवाची बाब केवळ .l भिकल्या धिंनडा यांच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण आदिवासी समाजासाठी प्रेरणादायी असून, महाराष्ट्र आणि विशेषतः पालघर जिल्ह्याला याचा सार्थ अभिमान आहे.


Share

2 thoughts on “प्रसिद्ध ‘तारपा’ वादक भिकल्या धिंनडा यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *