
एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक
मुंबई :प्रा.डॉ.एन.डी.पाटील विद्यालय ,सह्याद्री नगर,कांदिवली (पश्चिम)येथे दिनांक १७ जानेवारी रोजी विद्यार्थी व सर्व शिक्षक वर्गाच्या उपस्थितीत प्रा डॉ एन डी पाटील सरांचा चतुर्थ स्मृती दिन साजरा करण्यात आला.
समारंभाच्या अधयक्ष स्थानी स्कूलकमिटीचे सदस्य मदनराव चव्हाण हे उपस्थित होते.समारंभाचची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील व एन डी सरांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.विद्यार्थिनी तनुजा बावडकर व आरोही धुमाळ यांनी एन डी सरांच्या प्रेरक आयुष्याबदल माहिती सांगणारी भाषणे केली.विदयालयातील शिक्षक निवृत्ती प्रबळकर यांनी प्रा डॉ एन डी सरांचे विचार व विविध चळवळींचे नेतृत्व करून त्यांनी अवघ्या महाराष्ट्राला मार्गदर्शन केल्या बद्दल माहिती दिली.तसेच कर्मवीरांचे मानसपुत्र या नातयाने रयत शिक्षण संस्थेची संपूर्ण धुरा सरांनी आयुष्यभर सांभाळली याबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मदनराव चव्हाण यांनी सरांच्या विद्यालय उभारणी मधील योगदानाबददल माहिती सांगितली.
या भावपूर्ण कार्यक्रमाची सांगता पसायदानाचे करण्यात आली.
Very good.
कर्मवीर :प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांनी केलेले चळवळींचे मार्गदर्शन कधीच विसरता येणार नाही