प्रा.डॉ. एन.डी.पाटील विद्यालयात विज्ञान प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले

मुंबई : चारकोप सह्याद्रीनगर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा तसेच समाजातील समस्यांचे समाधान शोधण्याची प्रवृत्ती बळकट व्हावी या उद्देशाने सह्याद्रीनगर रयत शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील विद्यालयात भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त हे प्रदर्शन भरविण्यात आले.

प्रदर्शनाचे उद्घाटन “मिशन ग्रीन” या सामाजिक संस्थेचे संचालक श्री. शुभोजित मुखर्जी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी स्थानिक स्कूल कमिटी सदस्य मा. मदनराव चव्हाण, मुख्याध्यापिका सौ. जरे एस. एम., पालक, शिक्षकवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी ऊर्जा निर्मिती, प्लास्टिक पुनर्वापर, वाहतूक व दळणवळण, गणिती मॉडेल आदी विषयांवर आधारित अभिनव प्रकल्प सादर केले. पर्यावरणपूरक ऊर्जा, शाश्वत विकास आणि तंत्रज्ञानाचा सामजिक उपयोग यावर लक्ष केंद्रित करणारी मॉडेल्स पाहून पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले.

प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण होऊन विज्ञानविषयक उत्सुकता अधिक वाढीस लागेल, असा विश्वास प्रमुख पाहुण्यांसह उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. विद्यालयाच्या वतीने सर्वांनी प्रदर्शनाचे विशेष अभिनंदन केले.


Share

One thought on “प्रा.डॉ. एन.डी.पाटील विद्यालयात विज्ञान प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *