
एसएमसमाचार-प्रतिनिधी -वैशाली महाडिक
मुंबई : माजी शिक्षणमंत्री, समाजवादी नेते, दूरदर्शी विचारवंत आणि राष्ट्रसेवादल सैनिक प्रा. सदानंद वर्दे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्दे परिवार व मित्रमंडळींच्या वतीने एक अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम गुरुवार, ६ नोव्हेंबर २०२५ रोजी सायं. ६ वाजता वांद्रे (पश्चिम) येथील नॅशनल कॉलेज, लिंकिंग रोड येथे होणार आहे. कार्यक्रमापूर्वी सायं. ५.३० वाजता चहा-नाश्ताची सोय करण्यात आली आहे.
या कार्यक्रमात दोन भाग असतील —
🔹 भाग एक : परिसंवाद – “सन्मानाचे मरण : शेवटचा उंबरठा”
तज्ञ म्हणून
कुमार केतकर – ज्येष्ठ पत्रकार व माजी राज्यसभा खासदार
डॉ. निखिल दातार – ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ, ‘लिव्हिंग विल’ समर्थक
अजित जोशी – युवा लेखक आणि प्राध्यापक
तर समन्वयक म्हणून उदय दंडवते (संस्थापक – सोनीकरीम, सान फ्रान्सिस्को) कार्यभार सांभाळतील.
परिसंवादाचे अध्यक्षस्थान रामदास भटकळ – ज्येष्ठ विचारवंत व ‘पॉप्युलर प्रकाशन’ संस्थापक भूषवतील.
🔹 भाग दोन : युवा नवगीतांची मैफल
‘एल्गार’ साथींचा फोक फ्युजन बँड “रंग अमन के” आणि गीतकार बंकिम साँगकार यांची विशेष सादरीकरणे होणार आहेत.
भारत, समाज आणि माणूस यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना या कार्यक्रमाचे आग्रहाचे आमंत्रण आहे.
📞 संपर्क :
झेलम परांजपे – ८६५५०५२२७२
सुधीर देसाई – ९८२००६६३३७
Very good willattend
Good