प्रतिनिधी :मिलन शहा
बंगळूरू :आरसी बी च्या विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी आलेल्या फॅन्स चा चेंगरा चेंगरीत मृत्यू. हजारो आरसीबी फॅन्स विज्योत्सव साजरा करण्यासाठी आले होते
बंगळूरू च्या चेन्नस्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगरा चेंगरीत 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू ची माहिती प्राथमिक मिळाली आहे तसेच पंचवीस हुन अधीक जख्मी झाल्याचे वृत्त आहे.
सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सभेत आरसीबी संघाचा सत्कार होत असताना ही घटना घडली. यादरम्यान, गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले – लाखो लोक उपस्थित होते. आम्ही सध्या परिस्थिती सामान्य करण्याचा प्रयत्न करत आहोत. किती मृत्यू झाले आहेत हे अद्याप निश्चित झालेले नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या थोड्याच वेळात या घटनेची माहिती माध्यमांना देतील.
Verysad