बच्चू कडू ह्यांना शेतकरी आंदोलनाचे यश!

Share

एसएमएस -प्रतिनिधी -सुरेश बोर्ले

मुंबई: प्रामाणिक व बेधडक कार्यकर्ता आणि स्वच्छ राजकीय व्यक्ती!अशी प्रतिमा असणारे,आता शेतकरी नेते
म्हणून उदयास आलेले बच्चू कडू
ह्यांनी दिल्लीच्या धर्तीवर शेतकरी आंदोलन,मुख्य मंत्र्यांच्या नागपुरात सुरू केले.ह्या आंदोलनाची तीव्रता इतकी होती की शेवटी शेकऱ्यांना नेहमीच
लटकावणाऱ्या सरकारला झुकाव लागलं आणि शेतकरी कर्ज माफीच्या तारखेसाठी!
मा.बच्चू कडू ह्यांना नाईलाजास्तव चर्चेसाठी पाचारण करून,कर्ज माफीची तारीख जाहीर करावी लागली!हा मोठा विजय बच्चू कडूनचा आहे.
त्यामुळे शेतकरी आता खुश आहेत.आंदोलन बंद करण्याच्या मार्गावर आहेत.अनेक दिवसांपासून,बच्चू कडू ह्यांनी
बळीराजाचा हा विषय पकडून धरला होता.परंतु अनेक विनवण्या केल्यावरही सरकार
दुर्लक्ष करीत होते.शेवटी मोर्चाने
उत्तर दिल्यावर,ह्या आंदोलनात
अनेक शेतकरी नेतेही सामील झाले होते.शेवटी मराठा क्रांती नेते मा.मनोज जरांगे पाटीलही बच्चू कडू सोबत उतरले व कर्ज माफी आपली पदरात पाडून घेतली.आता ते समाधानी आहेत.


Share

5 thoughts on “बच्चू कडू ह्यांना शेतकरी आंदोलनाचे यश!

  1. ” आपना भिडू बच्चु कडू ” हे ब्रिद वाक्य पुन्हा एकदा सत्यात उतरलं..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *