
विशेष प्रतिनिधी :सुरेश बोरले
मुंबई, किरीट सोमय्या भारत देश हा प्रजासत्ताक व लोकशाही वादी राष्ट्र आहे.आपल्याला वाटते की संपूर्ण देशातून भ्रष्टाचार हा समूळ निघून जाईल किंवा आपल्या देशातून, जात-पात वंश धर्म यांची तफावत नष्ट होईल. काय? जनतेला वाटतं की संपूर्ण भारत हा भ्रष्टाचारा पासून मोकळा व्हावा. बंधू भाव असावा!ते शक्य आहे का? ते शक्य नाही कारण त्यांची पालेमुळे या राष्ट्रात किती खोल खोल गेलेली आहेत. कोणताही पक्ष सत्तेवर येऊन जरी बोंबला तरी, हा भस्मासुर काय जाणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे.आता उदाहरण घ्या आपल्या देशाचे, वर्तमान पंतप्रधान.नरेंद्र मोदी या, भ्रष्टाचारा विरुद्ध कितीतरी मोठ्या पटीने प्रयत्न करीत आहेत,पण त्यांना औषता यश येत आहे. मग तुम्ही आणि आम्ही कोण? परंतु या राष्ट्रात जोपर्यंत लोकशाही ची जाण नागरिकांना होत नाही तोपर्यंत भ्रष्टाचार हा बोकाळणारच!यात काही शंका नाही. हुकूम शाही आली तरच या गोष्टीला आळा बसेल अशी समाज सामानयान्ची होत चालली आहे.. अथवा क्रांती आवश्यक आहे. ज्याप्रमाणे रशियात क्रांती घडली लेलीनचे पुतळे जमीन दोस्त केले व त्यावर जनतेने नाच केला. तसेच ब्रिटनमध्ये मँचेस्टर येथेही कामगारांचे क्रांती घडली. चिन मध्ये विद्यार्थ्यांनी लोकशाही आणण्याचा प्रयत्न केला परंतु तो चिरडला गेला. भारतातही ब्रिटिशां विरुद्ध क्रांती केली. तेव्हा स्वातंत्र मिळाले. अशी अनेक उदाहरणे आहेत. भारतातही ही वेळ येणारच आहे,येणाऱ्या काळामध्ये.कारण जनता ह्या गोष्टीला वैतागलेलीआहे. ज्या !ज्या! पुरुषांनी राष्ट्र दावणीला लावले व ते आज पुतळ्याच्या रूपात नाक्या नाक्यांवर नाक्या नाक्यावर उभे आहेत. ज्यांच्यामुळे आज जनता हाल अपेष्टा भोगत आहे.त्या त्या महा पुरुषांच्या पुतळ्यांची,जनता विटंबना करेल! ते पाडून त्यांच्यावर नाचत राहतील, तेव्हाच या राष्ट्रामध्ये सुवर्णयोग येईल. कारण सोमय्याजी लोक या सगळ्या गोष्टींना कंटाळलेली आहेत. लोकांवर या गोष्टींचा अत्याचार होतोय. जेव्हा जेव्हा जगात अती अत्याचार झालाय.त्या त्या वेळेला क्रांती घडलेली आहे. वरील दिलेली उदाहरने देता येईल. त्यामुळे आपण कितीही हातात हातोडे घेऊन पुढे होऊन फोटो काढले तरी त्यात तथ्य नाही.ये पब्लिक है!ये सब जानती!आरे अंदर क्या है!आरे बाहर,क्या है?ये सब पहचानती है! आपण फक्त विशिष्ट पक्षांच्या लोकांच्या मागे भ्रष्टाचाराचा हातोडा घेऊन लागला आहात.बाकी आहेत ,त्यांचा काय? आज सत्ता आपली आहे. उद्या त्यांची येईल, मग दुसरा कोणी सोमय्या येईल तो आपला जलवा दाखवेल!हे कालचक्र चालतच राहणार. कारण भंपक व स्वार्थी गोष्टींच्या आधारावर आधारित लोकशाही ची उभारणी दिसत आहे. त्यामुळे येथे आपण फक्त विशिष्ट माणसांची नावे घेता?बाकीचे राजकारणी तुमच्या पक्षाबरोबर दावणीला बांधलेले ते काय धुतल्या तांदळाचे स्वच्छ आहेत का? ते प्रथम आपण तपासावे. असे जनतेला मनापासून वाटते. आपण दुसऱ्यांच्या पक्षातील लोकांची बांधकामे पाडत आहात, भ्रष्टाचारी
चौकशी लावत आहात,हे चांगल आहे. दूरचित्रवाणी व इतर माध्यमातून तुम्ही चमकता !हे चांगल सुधा चांगलं आहे. पण सगळ्यांना आपण समान द्यावा असे जनतेला वाटते.आपण जर इतर पक्षात डोकावूनही पहावे, अशी लोकांची अपेक्षा आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तराचा भ्रष्टाचार ही उखडून काढा. कारण केंद्रात आपली सत्ता आहे. असे तमाम लोकांना वाटते. आपल्या पक्षाने काश्मीरी कलम रद्द केले. राम मंदिर बांधले हे जनतेला अपेक्षित होते, त्या कृती केलेल्या आहेत, त्यामुळे भारतीय जनता आपल्या पक्षावर खुश आहे. याची आपण नोंद घ्या! आपल्या सारखा डॅशिं ग भ्रष्टाचार विरोधी नेता,जर का! राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, त्यांच्या मागे लागून, त्यांची बोकांडी पकडून आपण त्यांना भारतात आणावे! अशी लोकांची आकांक्षा आहे. असे कितीतरी भ्रष्टाचारी! आज देशाबाहेर आहेत. खरं तर त्यांनीच करोडोंचे भ्रष्टाचारी घोटाळे करून, भारतीय जनतेला कंगाल केलेले आहे. त्याचं काय? ह्यावर कारवाई आपण कशी करणार? आता लोकांची आपल्या बद्दलची अपेक्षा वाढलेली आहे आणि का वाढू नये? आपल्यासारखा नेता जर पुढे येत असेल,तर आपला पक्ष काय, संपूर्ण हिंदुस्तान तुमच्या मागे येईल. ही जनतेची मोठी मनोकामना आहे.फक्त मोठे मोठे हातोडे दाखवत साहेब आपण दाखले देता, मग या कामासाठी आपला हातोडा नाही?फक्त छोटीशी हातोडी जरी आपल्या या भामट्यांवरती फिरवली किंवा पडली तरी आपल्या जन्माचे सार्थक होईल,दुबई वाला ही, आपल्या कृपेने हिंदुस्थानात घसटत येईल, असे जनता जनार्दनास वाटते.