
File photo
लेखक सुरेश बोर्ले.
बादशाहे तरन्नूम म्हणजे गाणार राजा! स्व.महमद रफी हे गाण्याचे बादशहाच होते.खास करून त्यांनी आपला ठसा हिंदुस्थानी संगीतात उमटवला आणि हिंदुस्थानी फिल्मी संगीतामध्ये जी उंची त्यांनी गाठली, ती कुणीच गाठू शकत नाही.थोडक्यात त्यांची कारकीर्द पाहू. स्व.महमद रफी साहेबांचा जन्म!
२४डिसेंबर,१९२४ रोजी ब्रिटिशकालीन अमृतसर कोटला सुलतानपूर पंजाब येथे झाला.हे कुटुंबातील शेंडेफळ होत.ते लहानपणी पहाटे आपल्या दारावर भिक्षुकीसाठी येऊन भक्तिगीते गाणाऱ्या फकीरच्या मागे दूरपर्यंत जायचे.ही गाण्याची रुची रफीनचे वरिष्ठ बंधू स्व.हमीदभाई ह्यांच्या लक्षात आली.ते गाणारे फकीर हे त्यांचे प्रेरणा स्थान होते.कालांतराने त्यांचा परिवार लाहोर येथे स्थायिक झाला.मग हमीदभाईंनी त्यांना स्व.छोटे गुलामली खा व
स्व.फिरोज निजामी ह्या उस्तादानकडे शास्त्रीय गायनाच्या तालमीसाठी पाठवले.त्याकाळी एक घटना घडली. लाहोरमध्ये एक मोठ्या रंगमंचावर स्व.कुंदनलाल सहगल
जे फिल्मी संगीतात माहिर होते.त्यांचा गाण्याचा कार्यक्रम होता.सगळा रंगमंचगृह हा तुडुंब गर्दीने भरलेला होता.त्या कार्यक्रमाला रफीही हमीदभाईंन बरोबर हजर होते.कांहीं कारणास्तव,सहगल साहेबांना येण्यास उशीर झाला.लोक ताटकळत उभी होती.तेव्हा वेळ मारून नेण्यासाठी रफींना मंचावर हमीद भाईंनी जायला सांगितले.तेव्हा रफी साहेब १३ते१४वर्षाचे असतील.त्यांनी कांहीं गाणी बोलून प्रेक्षकांना खुश केले. दरम्यान कुंदनलालजी येऊन प्रेक्षकांमध्ये गुपचुप थांबले.गाणे संपल्यावर त्यांनी स्वतः जाऊन रफींना शुभाशीर्वाद दिला.हाच प्रसंग त्यांच्या जीवनाचा वळण बिंदू ठरला.कारण सदर कार्यक्रमास, संगीकार स्व.श्याम सुंदरजीही उपस्थित होते.त्यांना रफींचा आवाज आवडला.त्यांनी हमीदभाईंना, रफजीनना मुंबईत आणावे असे सुचविले.दरम्यान रफींची उस्तादानकडे तालीम चालू होतीच.त्यामुळे ते शास्त्रीय संगीतात प्राविण्यात आले.मग त्यांना पहिली गाण्याची संधी १९४४ साली गुल बलोच ह्या पंजाबी चित्रपटात मिळाली.येथून त्यांचा प्रवास सुरू झाला.मग श्यामसुंदर ह्यांनी सुचविल्याप्रमाणे मुंबईला ते आले.बऱ्याच खस्ता खाल्यावर,त्यांची ओळख
स्व.नौशाद अली ह्यांच्याशी
झाली. मग ही जोडी जमली. त्यांना १९४५ साली गावकी गोरी ह्या हिंदी चित्रपटात पहिल्यांदा गाण्याची संधी मिळाली.मग पुन्हा त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही.हिंदी सिने जगतात त्यांनी मजबूत पाय रोवला.सुवर्ण युगातील सिने संगीत सृष्टीतील दिग्गज संगीतकारान बरोबर काम करण्याची संधी त्यांना मिळाली त्यामध्ये सर्वश्री मदन मोहन, गुलाम महमद, सी.रामचंद्र,शंकर जयकिशन रवी,उषा खन्ना,रोशन,
खेमचंद,कल्याणजी आनंदजी, श्यामसुंदर, राजेश रोशन, खय्याम, एस. डी.बर्मन, आर.डी .बर्मन पंचम इत्यादी आहेत.पण रफींची खरी जोडी व रसायन जुळले ते लक्ष्मीकांत प्यारेलाल ह्यांच्याशी.त्यांच्या बरोबर १५० हून अधिक गाणी त्यांनी गायलेली आहेत.तर त्या सुवर्ण युगाचे गीतकार आनंद बक्षी, मजरूजह सुलतानपूरी, राजेंद्र कृष्ण,शकील बदायुनी,
शैलेंद्र,नीरज,योगेश,हसरत,
गुलशन बावरा वगैरे!त्या सुवर्ण युगाचे कलमकार मानकरी होते.सुवर्णयुग कलाकार ज्यांच्यासाठी स्व.रफी साहेबांनी पार्श्व संगीता सोबत आपला मधुर आवाज दीला व आजही ती गाणी अजरामर आहेत. त्यामध्ये दिलीप कुमार, देवानंद,
भारत भूषण,गुरुदत्त,
,राजेंद्र कुमार.शम्मी कपूर,शशी कपूर,प्रदीप कुमार,राज कुमार, सुनील दत्त,देव कुमार,जेमिनी गणेशन,सुजित कुमार,जॉय मुखर्जी,देब मुखर्जी, विश्वजीत,विजय आनंद,राजेश खन्ना, धर्मेंद्र,जितेंद्र,विनोद खन्ना,अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा,ऋषी कपूर ते मिथुन चक्रवर्ती पर्यंतच्या कलाकारांसाठी काम त्यांनी केलेलं आहे.तर हास्य अभिनेता महमूह,जॉनी वॉकर साठीही पार्श्व गायन केलेलं आहे.ह्या सगळ्या कलाकारांचा ते गाण्या पूर्वी अभ्यास करीत,मगच गाणे गात.त्यामुळे पडद्यावरचा कलाकार हा त्यांच्याच आवाजात गात आहे असा हुबेहूब भास प्रेक्षकांना व्हायचा.हा त्यांचा हातखंडा होता.मग ती गाणी रोमँटिक,दुःखी,विरहाची,
कव्वाली, गजल,नशेबाज असोत ही सगळी गाणी स्व.रफी साहेबांनी जीव ओतून गायलेली आहेत.म्हणून आजही ती गाणी तरुण वाटतात.
पार्श्र्वगायक स्व,किशोर कुमार ह्यांनी “रागिणी”ह्या चित्रपटात रफींचा आवाज उष्णा घेतलेला आहे. एव्हढी महानता ह्या गायकांत आहे.तर महिला गायकांसोबत स्व.लता मंगेशकर,आशा भोसले,गीतादत्त,
नूरजहा,सुरैय्या आदीं बरोबर दुगल गीतांमध्ये त्यांचा हात कुणी पकडणार नाही.थोडा वादही झाला.पण तो सुमन कल्याणपूरकर ह्यांनी भरून काढला.अतिशय दानी वृत्तीची व्यक्ती म्हणून लोकप्रिय होते.अजात शत्रू असणारा
माणूस.वेळ पडल्यास फुकटात ही कार्यक्रम करणारा माणूस.मनमिळू दिलदार माणूस म्हणून अशी त्यांची ख्याती होती.त्यांनी १९६२ च्या चीन युद्धात सीमेवर जाऊन तेथे देशभक्तीची गाणी गाऊन जवानांचे मनोबल वाढवले होते.पंडित नेहरूंनीही त्यांची प्रशंसा केली होती.त्यांनी कधीच पैशांचा मोह नाही ठेवला,फक्त माणुसकीच कमावली, माणसे जोडली!अजात शत्रू असा माणूस.महाराष्ट्र व मुंबई एकीकरण चळवळींत ते अग्रेसर होते.हे कुणालाच माहिती नाही.ते सच्चे देशप्रेमी होते. फिल्मी व बगेर फिल्मी अशी त्यांनी २५००० गाणी गायलेली आहेत,हा एक जागतिक विक्रम आहे.अनेक कलाकार व चित्रपट त्यानच्याच जोरावर चालले,हे त्यांना माहिती होते.पण त्यांनी कधी गर्व केला नाही.वेळेवर आपल काम अपक्षे पलीकडे करण ही त्यांची सेवा भक्ती होती.
स्व.रफी साहेबांनी ४०वर्षाच्या कारकिर्दीत,आपल्या जीवनात अनेक पुरस्कार मिळवले. त्यामध्ये ४ वेळा फिल्म फेअर पारितोषिक मिळवली.एक राष्ट्रीय पुरस्कार.१९६७ साली भारत सरकारने त्यांना
उच्च नागरिक!
“पद्ममश्री” या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केले.
अशा या अवलिया कलाकाराच शेवटच ध्वनिमुद्रण फिल्म आसपास साठी स्व.लक्ष्मीकांत ह्याच्या सोबत होत.ध्वनिमुद्रण बराच काळ चालल,ते रात्री संपलं.जाताना रफी साहेब लक्ष्मीजींना अब मय चलता हुं?ह्या शब्दात निरोप घेत सांगितले.लक्ष्मीजीही आश्चर्य चकित झाले.रफीजी घरी निघाले.रात्री त्यांची प्रकृती बिघडली.त्यांना हृदय विकाराचा झटका आला.त्यांना इस्पितळातही नेले.
पण ३१ जुलै,१९८० रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.ही बातमी वाऱ्या सारखी लोकांमध्ये पसरली.चाहते त्यांच्या वांद्रे येथील घरी गोळा झाले.आभाळही रडू लागले. इतका पाऊस त्यादिवशी पडत होता.लाखोंच्या संख्येने त्यांचे चाहते,साश्रू नयनांनी वांद्रे ते सांताक्रूझ अंत्ययात्रेत सामील झाले.आजही ते सांताक्रूझ येथील कब्रस्तानात चिरनिद्रेत आहेत.आजही लोक त्यांच्या कबरीच दर्शन घेण्यासाठी,फुल घेऊन जातात,हीच त्यांची पुण्याइ व लोक कमाई आहे.स्व.महमद रफी सारखा होणे नाही.त्याच्या
१०१वी पुण्यतिथीला,भारतातील तमाम जनते तर्फे त्यांना आदरांजली!
लेखक हे स्वता गायक आणि महमद रफीयांचे चाहते आहेत.
Great Singer
Great Singer&Humanbeing
All time great singer hats off to Rafi saab
I am big fan of Rafi shaab & like all buet with lata mangeshkar