
एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक
इचलकरंजी : बालविवाह प्रतिबंधक अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘बालविवाह मुक्ती रथयात्रा’चा समारोप कार्यक्रम समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजी येथे उत्साहात पार पडला. समाजात बालविवाहासारख्या कुप्रथेविरुद्ध जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला होता.
हा उपक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या फेलोंचे संविधान परिवार, इचलकरंजी यांच्या वतीने साने गुरुजी यांच्या पुस्तकाचे भेट देऊन अभिनंदन करण्यात आले.
या रथयात्रेद्वारे बालविवाहाचे दुष्परिणाम, मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या हक्कांबाबत समाजात जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी बालविवाह रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याची गरज आहे.
Great
बालविवाहासारख्या कुप्रथेविरुद्ध जनजागृती करणे खुपच गरज आहे अजुन ही काही राज्यात हे प्रकार चालत आहे