
एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले
मुंबई महानगर पालिकेच्या बी विभाग प्रांगणातील सभागृहात डिजिटल फसवणूकीपासून बचाव आणि सुरक्षा संदर्भात विभागातील आस्थापनेवरील कर्मचारी संवर्गास सायबर गुन्हे व वर्तणूक या विषयी अत्यंत महत्वाचे जनजागृती सत्र सोमवारी साहाय्यक आयुक्त योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.हे बी विभाग कार्यालयातील का.म.लें.अ.प्र.प्रमुख अंतर्गत तक्रार समिती व सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्र व सायबर वेलनेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यामाने सकाळी ११ ते १ वाजता या वेळेत सायबर जनजागृती या विषयी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.यावेळी पालिका कर्मचारी व अधिकारी यांनी उपस्थित राहून सत्राचा लाभ घेतला.
सायबर वेलनेस सेंटरतर्फे दोन्ही प्रशिक्षक व समुपदेशक ओवी भालेराव आणि रीम शेख ह्या महिला अधिकारी यांनी उपस्थितांना सायबर सुरक्षा आणि जनजागृतीचे महत्व विशद केले.प्रशासकीय अधिकारी कविता डोके यांनी या शिबिरात जास्तीत जास्त कर्मचारीवर्गाने उपस्थित राहावे म्हणून विशेष काळजी घेतली.
महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना सुरक्षित डिजिटल वातावरण देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.आमच्या विभागातील कार्यालयीन महिलांना सायबर गुन्ह्यांपासून वाचवण्यासाठी डिजिटल सुरक्षा, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर आणि ऑनलाइन फसवणुकीविषयी जनजागृती होण्यासाठी या शिबिर सत्राचा फारच उत्तम उपयोग होईल.असे बी विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश देसाई यांनी यावेळी म्हटले.