
प्रतिनिधी : उत्कर्ष बोर्ले
मुंबई : दहिसर पूर्वेतील आनंद नगर येथील सिग्नल जंक्शनवर गेल्या तीन महिन्यांपासून एक मोठ्या आकार व उंचीचा पायलिंग मशीन मुध्रणेश्वर महादेव मंदिरच्या समोरच्या बाजूला बेवारस अवस्थेत पडून आहे, ज्यामुळे मुख्य रस्त्याच्या कोपऱ्यावरील सिग्नल बाधित होत आहे. या मुळे पूर्वेकडील मुख्य रस्त्यावरून (पराग नगर कडून) छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलाकडे जाणारे वाहनचालक सिग्नल दिसत नसल्याने बेपर्वाईने वाहन चालवत आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघनामुळे या जंक्शनवरून शाळेत जाणारे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला – सामान्य पादचारी जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडत आहेत. या जंक्शनपासून थोड्या अंतरावर रस्त्यावर सीसीटीव्ही बसवलेले असूनही, वाहतूक पोलिस, दहिसर पोलिस स्टेशन किंवा महानगर पालिका ने या समस्येकडे लक्ष दिलेले नाही. सीसीटीव्ही कॅमेरे काम करत आहेत की नाही असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते राजेश पंड्या यांनी हा अवरोध तात्काळ हटवण्याची मागणी करताना सांगितले की जर रस्त्यावर बेकायदेशीरपणे पार्क केलेली वाहने आढळल्यास वाहतूक विभाग असे वाहनांची टोईंग करून दंड आकरतात तर मग या पायलिंग मशीनवर कारवाई का करत नाही ? लोकांची समस्या सुटली नाही तर लोकांनी रस्ता रोको करुन प्रशासनाचा लक्ष वेधावे लागेल असा इशारा ही दिला तसेच . जर काही अपघात झाला तर त्या जबाबदार प्रशासन राहील.
Good job utkarsh sir.
Very good