“भक्तिमार्ग समृद्ध करणार्‍या स्त्रिया”..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक

मुंबई :ग्रंथ तुमच्या दारी,  चारकोप विभाग आणि  सांस्कृतिक समिती, पॅगोडा व्ह्यू सोसायटी ह्यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन आणि आंतरराष्ट्रीय महिला दिन ह्या दोन्हीचे औचित्य साधून  आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मा.ह.भ.प. मधुरा प्रभू अनारेडी ह्यानी “भक्तिमार्ग समृद्ध करणार्‍या स्त्रिया” ह्या  विषयावर प्रवचन सादर केले.  त्यांच्या मधुर स्वर , संस्कृत भाषेवर प्रभुत्व,  ओघवती वाणि, विषयाचे  उत्तम जाण ह्यामुळे श्रोते अगदी मंत्रमुग्ध झाले होते. तसेच श्रीमती श्रीकांती नगरकर ह्यानी कुसुमाग्रज ह्यांच्या निवडक कवितांचे उत्तम सादरीकरण केले. कविताचा अन्वयार्थ समजून सांगितला.  ह्या कार्यक्रमाच नियोजनाची जबाबदारी ग्रंथ तुमच्या दारी तर्फे डॉ अंजली आळेकर ,  परिणीता माविणकुर्वे  आणि पॅगोडा सांस्कृतिक समिती संस्थेचे  अध्यक्ष मंगेश यादव आणि राजेंद्र गावडे ह्यानी यशस्वीरीत्या पार पाडली.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *