भव्य वैद्यकीय शिबिर व ऑफशोअर संवेदीकरण उत्साहात संपन्न.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले

ओएनजीसी पुरस्कृत व ओएनजी सी स्थानीय लोकाधिकार समितीचे उपाध्यक्ष पंकज कोळी (शेट्टी) तसेच सारिका लडगे यांच्या पुढाकाराने डोंगरी गल्ली, वेसावा कोळीवाडा, अंधेरी  येथे रविवार, दिनांक २१ डिसेंबर  रोजी भव्य वैद्यकीय शिबिर व ऑफशोअर संवेदीकरण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

या शिबिरामध्ये मढ, वेसावा  भागातील तब्बल ७४० गरजू रुग्णांनी लाभ घेतला. पुरुष, महिला व बालकांसाठी विविध प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. तसेच प्रत्येक रुग्णास मोफत औषधे, चष्मे, ज्यूट पिशव्या, टी-शर्ट व टोप्या भेट स्वरूपात वितरित करण्यात आल्या.

या कार्यक्रमाचे उद्घाटन  ओएनजीसी समूह महाप्रबंधक (उत्पादन)  दीपक भटनागर यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी, रायगड जिल्हाध्यक्ष अजय सोडेकर, तसेच प्रदीप टपके, नारायण कोळी, हरेश भानजी, गणेश वाधिकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजहंस टपके यांनी केले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी आभार प्रदर्शन करताना पंकज कोळी (शेट्टी) यांनी सांगितले की,  दीपक भटनागर हे उत्तम प्रशासक असून ते मच्छिमारांना मित्रासारखे मानतात. त्यांच्या सहकार्यामुळेच हा भव्य वैद्यकीय शिबिराचा उपक्रम यशस्वी होऊ शकला. तसेच महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल त्यांनी विशेष कृतज्ञता व्यक्त केली.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डोंगरीकर तरुण मंडळ, डोंगरीकर महिला मंडळ, तसेच तुषार म. चिंचय, अलंकार भगत, सनी शेंडे, शिवा चिखले, सौ. सारिका लडगे, उर्मिला चिंचय, कविता लडगे यांचे उल्लेखनीय सहकार्य लाभले.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *