भांडुप वॉर्ड ११४ मधून राजुल संजय पाटील यांचा उमेदवारी अर्ज स्वीकार.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा

बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी भांडुप प्रभाग क्रमांक ११४ मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – महाराष्ट्र नवनिर्माण सेना युतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून राजुल संजय पाटील यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आला. हा अर्ज शिवसेना पक्षप्रमुख सन्मा. उद्धवसाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख सन्मा. आदित्यसाहेब ठाकरे यांच्या हस्ते स्वीकारण्यात आला.
यावेळी राजुल संजय पाटील यांनी हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी पूर्ण निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
या प्रसंगी खासदार सन्मा. अनिल देसाई, आमदार सन्मा. सुनील राऊत, विभागप्रमुख सन्मा. रमेश कोरगावकर, विभागप्रमुख सन्मा. सुरेश पाटील, आमदार सन्मा. वरुण सरदेसाई, शिवसेना सचिव सन्मा. सूरज चव्हाण यांच्यासह शिवसेना व युतीतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भांडुप प्रभाग ११४ मध्ये शिवसेना (उबाठा) – मनसे युतीच्या उमेदवारीमुळे राजकीय वातावरण तापले असून येत्या निवडणुकीत ही लढत चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.


Share

One thought on “भांडुप वॉर्ड ११४ मधून राजुल संजय पाटील यांचा उमेदवारी अर्ज स्वीकार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *