
file photo
प्रतिनिधी :मिलन शहा
तेलंगणाच्या राजकारणाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे भाजप आमदार टी राजा सिंह यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.टी राजा सिंह हे तेलंगणाचे एक फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जातात.
तेलंगणा भाजप अध्यक्ष म्हणून नवीन नाव समोर आल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे कळत.भाजप आमदार टी राजा सिंह यांनी सोशल मिडीयावर “एक्स” वर पोस्टमध्ये लिहिले आहे की अनेक लोकांचे मौन संमती मानू नये. मी केवळ माझ्यासाठी नाही तर असंख्य कार्यकर्त्यांसाठी आणि मतदारांसाठी बोलत आहे ज्या विश्वासाने आमच्यासोबत उभे राहिले आणि आज निराश होत आहेत. जय श्री रामअसं त्यांनी एक्स वरील पोस्ट मध्ये लिहले असल्याने तेलंगनाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तसेच भाजप च्या गोटात ही चिंतेच वातावरण आहे.
संधिसधु