भारताची पहिली एमआरआय मशीन तयार, चाचणी एम्समध्ये केली जाईल..

Share

प्रतिनिधी :मिलन शहा


भारताने पहिले स्वदेशी एमआरआय मशीन विकसित केली आहे. एम्स दिल्लीने सांगितले की, या वर्षी ऑक्टोबरपर्यंत क्लिनिकल चाचण्यांसाठी हे एमआरआय स्कॅनर स्थापित केले जाईल. महागड्या आयात केलेल्या मशीनवरील अवलंबित्व कमी करणे आणि एमआरआय स्कॅनिंग स्वस्त आणि अधिक सुलभ बनवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. हा प्रकल्प इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या समीर (सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग अँड रिसर्च) च्या सहकार्याने राबविला जात आहे. समीरचे महासंचालक पीएच राव म्हणाले की, क्लिनिकल आणि मानवी चाचण्यांसाठी परवानगीची वाट पाहत आहे. सध्या, भारतातील 80ते 85टक्के वैद्यकीय उपकरणे परदेशातून आयात केली जातात. आर्थिक वर्ष 2022-24 मध्ये वैद्यकीय उपकरणांची आयात 168885 कोटी झाली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 13टक्के जास्त आहे. या उपक्रमाद्वारे, भारत आपल्या आरोग्य सेवांना स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत आहे. भारतात, फिशर मेडिकल व्हेंचर्स (चेन्नई) आणि व्होक्सेलग्रिड्स इनोव्हेशन (बेंगळुरू) सारख्या कंपन्यांनी आधीच एमआरआय मशीन विकसित केल्याचा दावा केला आहे. आता MeitY आणि SAMEER यांच्या सहकार्याने, देशभरातील रुग्णालयांमध्ये लवकरच 1.5 टेस्ला एमआरआय स्कॅनर बसवले जाईल.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *