लेखक…सुरेश बोरले.
सध्या ही परिस्थिती भारताच्या आसपास राष्ट्रांची आहे.परंतु वास्तविकता पाहता!तर भारताची ही परिस्थिती सर्व बाबतीत काही वेगळी नाही. भारतावरही अमाप कर्जाचा डोंगर उभा आहे,येथे भ्रष्टाचार हिमालयाहून मोठा आहे, महागाईचा राक्षस तर पाचवीलाच जनतेच्या पुजलेला आहे.बेकारी समुद्राहून मोठी आहे,सामाजिक
समानतेची यादवी आहे,मतदान जाती धर्माच्या आधारावर होत आहे,जातीय दंगली,महिला अत्याचार,पक्ष फोडा फोडी, ईडीचा गैरवापर अशा अनेक बाबतीत ही सरकारी यंत्रणा पोखरलेली आहे.ह्याला सर्वस्वी जबाबदार हे सरकारचआहे.हा जनतेचा कौल आहे.कारण हिंदुत्वाच्या नावाखाली लोकांची दिशाभूल व फसवणूक चाललेली आहे.दरवेळेस जनतेच लक्ष विचलीत करण्यास हे सरकार हुशार आहे.वेळ मारून नेणे हा ह्या राजवटीचा हेका आहे.हे जनतेला आता समजलेलं आहे.तर ईवीएम मशीनचा घोटाळा हा सर्वश्रुत आहे.हा तरुण वर्ग फक्त इतर आसपासच्या राष्ट्रात बिथरलेला आहे असं नाही?तो भारतात मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे.तो राजकीय धाकाने गप्प आहे.पण मनातून तो आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.कारण बेकारीमुळे तो नशेबाजी,गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळलेला आहे.तर स्वार्थी राज्यघटनेने,ह्या तरुणाचे कंबरडेच मोडले आहे.ह्या तकलादू घटनेमुळे जाती धर्माच्या आधारावर होणाऱ्या आंदोलनात!त्याला गुंतवलेले आहे. आरक्षण मिळालेल्या मूळे ,तळागाळातला समाज हा प्रगत व आर्थिक सक्षम होत चाललेला आहे तर काही इतर आर्थिक मागासलेल्या समाजा कडून आरक्षणाची मागणी होत आहे कारण.नोकरी धंधा अभावी तो वण वण भटकतो आहे.म्हणून मराठा,ओबीसी, धनगर,बंजारा समाजा सारख्या इतर जाती जमाती या आंदोलने व उपोषणे करून सरकारवर दबाव टाकत आहेत.
ह्या आंदोलनानचा उद्रेक झाल्यास, ईतर राष्ट्राहूनही भयानक स्थिती भारतात होऊ शकते.तो दिवस येईल का. हा तरुण असाच जर रखडला!तर त्याची प्रगती व विकास कधी होणार?ही मोठी समस्या आहे.कारण भारत देश हा जगात तरुण देश म्हणून वावरतोय.हे जगाला सांगायला व मिरवायला ठीक आहे.पण देशांतर्गत काय परिस्थिती आहे?हे जगाल कुठे माहित आहे! सामाजिक विषमता! ही ह्या देशात जो पर्यंत भंपक व तकलादू आधारावर,”लोकशाही” असे पर्यंत राहणार आहे.आता ह्या लोकशाहीचा जनतेला विट आलेला आहे.कारण ह्या लोकशाहीत कायद्यांना बळकटी असून ही.मात्र भ्रष्टाचारी व गुन्हेगारी वृत्ती असलेल्याच्या हातात सत्ता येते तेव्हा.कायद्याचं वर्चस्व व अंमलबजावणी होत
नसल्याने कायद्याचा धाक नाही.त्यामुळे ह्या वाम गोष्टी घडत
आहेत.ह्याच कारणास्तव भारताच्या आसपास देशात आंदोलने व क्रांती तेथील राजवटींविरुद्ध झालेली आहे!तशीच क्रांती येथे घडेल का…??
Be alert