
एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक
मुंबई : दि.26 नोव्हें.2025 रोजी बौद्धजन पंचायत समिती गट क्र.29 मालाड (प.) ,बौ.पं.स.शाखा क्र.835 ,संलग्न माता भीमाई महिला मंडळ/अंतर्गत गंधकुटी बुद्धविहार आंबोजवाडी या संघटनेच्या वतीने भारतीय संविधान सन्मान दिन दिमाखात साजरा करण्यात आला. या दिवशी संपूर्ण भारतात हा दिवस साजरा केला जातो. ह्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी बौद्धजन पंचायत समिती गट क्र.29 चे विश्वस्त गट प्रतिनिधी तसेच आर.पी.आय. मालाड विधानसभा अध्यक्ष (आ.) सुनिल गमरे आवर्जून वेळात वेळ काढून उपस्थित होते. अजून पाहुणे म्हणुन समाजसेविका धम्म भगिनी लीलाताई जाधव, आशाताई खैरनार शाखा अध्यक्षा आर.पी.आय. ह्या हि उपस्थित होत्या. त्यांनी संविधान सन्मान बाबत मार्गदर्शन केले. श्री. सुनिल गमरे यांनी या संविधान सन्मान कार्यक्रमात योग्य असे मार्गदर्शन केले. संविधान सन्मान सन्मान हा आपण बौद्ध धर्मियांना साजरा केलाच पाहिजे पण त्याच बरोबर सर्व भारतीयांना हि आपल्या भाषणात विनंती केली की हे संविधान आपल्या भारताचा प्रथम राष्ट्रग्रंथ आहे .तेव्हा आपण सर्व भारतीय नागरिक म्हणुन हा दिवस साजरा केला पाहिजे. त्याच बरोबर सर्वांना एक बाब लक्षात आणून दिले जसा आपण हा संविधान सन्मान दिन साजरा करतोय त्याच प्रमाणे भविष्यात संविधान च्या संरक्षण करण्यासाठी ही सज्ज व जागृत राहिले पाहिजे. येवढा मोलाचा सल्ला देऊन. सर्वांना शुभेच्छा दिल्या. हा संपूर्ण कार्यक्रम स्थानिक पंचायत शाखेचे सचिव श्री. अजित पवार यांनी सभेचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली व कार्यक्रम शोभून नेला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम कदम यांनी केले. तसेच या कार्यक्रमाला शाखेच्या महिला मंडळाच्या कार्यकारिणी, सभासद ही उपस्थित होते. रिना जाधव, अपर्णा जाधव, चंदनी शिंदे, मीनाक्षी जाधव, रोहिणी जाधव, प्रिती दाभोळकर,पुरुष सभासद राजेंद्र जाधव, रूपेश तांबे, पंकेश जाधव, संदीप कांबळे, उमेश जाधव, फोटोग्राफर रोहित जाधव,,आरती शिंदे, यांनी मोलाचे सहकार्य केले. सुनिल गमरे सोबत आयुष सिंह ही उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सभेचे अध्यक्ष अजित पवार यांनी संबोधले व उपस्थित अतिथी सुनिल गमरे यांचा पुष्पगुच्छ व संविधान उद्देशिका ची आवृत्ती देऊन सत्कार केला व आभार मानले. व कार्यक्रमाचा समारोप केला.
जय संविधान
Jay sanvidhan