एसएमएस-प्रतिनिधी-उत्कर्ष बोर्ले
नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमी येथे आज होणाऱ्या महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यावर पावसाचे सावट दिसत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दुपारी ४ ते ७ वाजेच्या दरम्यान २० ते ५० टक्के पावसाची शक्यता आहे. सामना दुपारी ३ वाजता सुरू होणार असून वातावरण आर्द्र आणि अंशतः ढगाळ राहील. तापमान २५°C ते ३२°C दरम्यान असण्याची शक्यता आहे.
🌦️ पाऊस झाल्यास काय होईल?
🗓️ राखीव दिवस: सामना मध्येच थांबला तर तो सोमवार, ३ नोव्हेंबर रोजी ज्या ठिकाणी थांबला तिथून पुन्हा सुरू होईल.
⚾ किमान षटके: निकाल लागण्यासाठी प्रत्येक संघाने किमान २० षटके खेळणे आवश्यक आहे.
🏆 ट्रॉफी वाटली जाईल: जर दोन्ही दिवस पावसामुळे सामना खेळता आला नाही, तर भारत आणि दक्षिण आफ्रिका दोघांनाही संयुक्त विजेते घोषित केले जाईल.
💥 सुपर ओव्हर: सामना बरोबरीत सुटल्यास विजेता ठरवण्यासाठी सुपर ओव्हर खेळवला जाईल.
आयसीसीने सामना निकालापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व तयारी केली आहे. पाऊस झाला तरी शक्य असल्यास ओव्हर्स कमी करून सामना त्याच दिवशी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल.
👉 आता सर्वांचे लक्ष हवामानावर आणि भारताच्या ऐतिहासिक विजयाकडे! 🇮🇳
दुष्काळात तेरावा महिना अशी गत झाली असून पावसाने थोडं थांबण्याची कृपा करावी…
चांगली संधी आहे भारतीय महिलांना क्रिकेट वर्ल्ड कप जिंकण्याची!!
थाम्बरे थाम्ब पावसा,
Rimzim