मढ मार्वे रोडवर भीषण अपघातात आई–मुलीचा दुःखद अंत.

Share

प्रतिनिधी :एसएमसमाचार.

मुंबई : मालाड पश्चिमेतील मढ मार्वे रोड वर मास्तरवाडी, अक्सा गाव परिसरात मंगळवारी (दि. २१ ऑक्टोबर २०२५) रात्री ८ वाजता च्या सुमारास भीषण अपघात झाला. मार्वे कडून अक्सा कडे जाणाऱ्या बसने समोरून येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या मोटरसायकलवर चौघे सदस्य असलेले एक कुटुंब बसलेले होते.

अपघातात मोटरसायकलवरील आठ वर्षांची चिमुरडी पिहू सुनील कंकालिया व तिची आई ज्योती सुनील कंकालिया (वय ४२) या दोघी गंभीर जखमी झाल्या. तातडीने त्यांना उपचारासाठी शताब्दी रुग्णालय, कांदिवली (पश्चिम) येथे हलविण्यात आले; मात्र कर्तव्यावरील डॉक्टरांनी तपासून दोघींनाही दाखलपूर्व मृत घोषित केले.

या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांच्या नातेवाईक सुनील कंकालिया यांच्या तक्रारीवरून मालवणी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस उपनिरीक्षक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

सदर अपघातात मयत महिलांचे पती आणि दुसरी मुलगी सुखरूप असल्याचे पोलिसांनी सांगितले.


Share

6 thoughts on “मढ मार्वे रोडवर भीषण अपघातात आई–मुलीचा दुःखद अंत.

  1. बेस्ट बस चालक मालाड स्थानक,मार्वे रोड ते संपूर्ण मढ च्या टोकापर्यंत जे बस हाकायला घेतात ते सरळ,सरळ बेभान अवस्थेत असतात.त्यामुळे खासकरून दुचाकी स्वारांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.या नालायक तथा बेभान चालकांची बेस्ट प्रशासनाने वेळीच दाखल घ्यायला हवी.जेणेकरून अशा भीषण अपघाताच्या घटना घटना टळतील…

  2. मढ मार्वे रोड वर मास्तरवाडी, अक्सा गाव या परिसरात नेहमी दारू पिऊन बेफाम वेगाने तिबबल सिट गाडया चालवणारे व वावरनारे लोक आणि शरिर व्यावसाय करणारे नहमी दिसतात या लोकान वर कारवाई कधीच होत नाही असे अपघात होतच राहणार पोलिस कधि हि आपले काम निट करत नाही

  3. माझा नाव जीतू आहे आणि मि मुलगी ज्योति तेचा सगा भाऊ आहे वर्ती न्यूज मद्दे मास्टर वादी जगा नहीं आहे न्यूज चैनल ला विनंती आहे कही पन लिहू नाका अक्षा शीतला माता मंदिर जवड़ जालेला आहे मि बचाव करणीय साठी गेलों पन अकस्मात होऊंन 20 मिनट जलाली बेस्ट बस चालक ला पोलिस प्रोटेक्शन देऊँन तिकड़न पोलिस स्टेशन ऑनल माला खुप दुःख आहे आसे बस चालक मजा परिवार उजड़ ले न्याय माला नाही मिडल अस प्रकरण झाला ,माला तो ड्राईवर भेटला नाही नहीतर मि माजी सगी बहिन ला न्याय जागा वर दिला होत माला कोना वर्ती विश्वास नाही आहे माला महाराष्ट ची जनता सपोर्ट करा नाहित परत कौन ड्राईवर कोनाला कुचलुन परत बाहेर येणार best best खुप ताकतवर आणि मोटा डिपार्टमेंट आहे पन आसा तुम्ही जीव किती घेणार माला कदी पन पुलीस कङून न्याय भेतलाच नाही त्याचिं पावर सामोर, आता माला विश्वास नाई आहे असे ड्राईवर ला पन आशी च मृत्यु भेंटायला पहिजे,

  4. जीतू ❤️‍❤️‍✍️
    महाराष्ट्र की जनता मेरे भाई और बहन आप को मेरे और से सब से बड़ी विनंती है के आप आपकी पत्नी और आप के बच्चे बाइक पर मालवणी से मढ़ जा रहे है तो ये मेरी बात का ख्याल रखना के आप उस रोड पर यात्रा सफर ना करो ज़िंदगी में खास करके नए दिन यानि अमावस या कोई तहेवर
    उस रोड पर मार्वे से लेके मढ़ तक इतने लोग मर चुके के आप सोच नहीं सकते , यानि के मेरे कहना का मतलब ये है शादीशुदा औरत को काफी खतरा हो सकता है कोई तो बुरी आत्मा की वजह से , अक्सर शादीशुदा परिवार ही मर जाता है ये रोड पे , बाकी आपकी मर्जी आपका परिवार सही सलामत रहे हमेशा ये मेरी दुआ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *