
प्रतिनिधी : उत्कर्ष बोर्ले
मुंबई :मढ मध्ये राहणाऱ्या मुस्लिम नागरिकांसाठी दफनभूमीचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. परिसरात दफनभूमीची सुविधा उपलब्ध नसल्याने मृतदेह अंतिम संस्कारासाठी मढ येथून वर्सोवा येथे फेरीबोटीच्या साहाय्याने नेले जातात.
या प्रवासात केवळ मृत व्यक्तीच नव्हे, तर त्यांचे शोकाकुल नातेवाईकही पावसात फेरीबोटीतून जावे लागते. सर्वसामान्य कुटुंबांवर या प्रवासाचा आर्थिक बोजा पडतो, कारण अशा दुःखद प्रसंगीही फेरीबोटीचे तिकीट आकारले जाते. कालच अशाच एका घटनेत फेरीबोट सेवा वापरताना तिकीटासाठी पैसे मागण्यात आले, आणि त्यामुळे उपस्थित नागरिक भावनिकदृष्ट्या व्यथित झाले.
मृत्यूचा प्रसंग अत्यंत दुःखद असतो. अशा वेळी शासकीय संस्था व सेवांनी नागरिकांना आधार द्यायला हवा, पण येथे उलट आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे मुस्लिम समाजाने मागणी केली आहे की, अंतिम संस्कारासाठी होणाऱ्या प्रवासात फेरीबोट तिकीट माफ करण्यात यावे किंवा निदान शासकीय मदत मिळावी.
स्थानिक प्रशासन आणि महानगरपालिकेने या गंभीर विषयाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
चौकट :स्थानिक आमदार अस्लम शेख आणि नगरसेविका संगीता संजय सुतार यांनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न चालू ठेवले आहेत, अशी माहिती मिळते. मात्र प्रत्यक्षात अद्यापही दफनभूमीसाठी निश्चित जागा उपलब्ध झालेली नाही.
https://shorturl.fm/XIZGD
https://shorturl.fm/5JO3e
https://shorturl.fm/5JO3e
https://shorturl.fm/TbTre
https://shorturl.fm/68Y8V
https://shorturl.fm/oYjg5
https://shorturl.fm/6539m
Sad