मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण सत्राचे आयोजन..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक

मुंबई : मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार साधण्यासाठी वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन तसेच सागरी डिझेल इंजिन देखभाल व परिचालन या सहा महिन्यांच्या 135 व्या सत्राचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण 1 जानेवारी 2026 ते 30 जून 2026 या कालावधीत होत असून पात्र मच्छिमारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या प्रशिक्षणात मत्स्यव्यवसाय नौकानयनाचे मूलतत्त्व, सागरी डिझेल इंजिनचे भाग, त्यांची दुरुस्ती, मासेमारीची आधुनिक साधने तसेच प्रात्यक्षिक सत्रांचा समावेश आहे. दारिद्ररेषेवरील प्रशिक्षणार्थींना प्रतिमहिना 450 रुपये तर दारिद्ररेषेवरील प्रशिक्षणार्थींना प्रतिमहिना 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
या प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छिमार व प्रकृतीने सुदृढ असणे आवश्यक असून त्याचे वय 18 ते 35 वर्षे असावे. प्रशिक्षणार्थीना पोहता येणे बंधनकारक असून तो किमान इयत्ता चौथी उत्तीर्ण असावा. त्याला मासेमारीचा किमान दोन वर्षांचा अनुभव आणि बायोमेट्रिक/आधार कार्ड धारक असावा. त्याचप्रमाणे त्याच्याकडे मच्छिमार संस्थेची शिफारस असलेला परिपूर्ण अर्ज आणि दारिद्ररेषेवरील असल्यास संबंधित प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे.
या प्रशिक्षण सत्राकरिता इच्छुक व पात्र मच्छिमारांनी विहित नमुन्यातील अर्ज संबंधित मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशीसह मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा, मुंबई-19 येथे 22 डिसेंबर 2025 पर्यंत सादर करावेत, असे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी स. श. भालेराव यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी सचिन भालेराव, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी (9920201207) आणि जयहिंद सूर्यवंशी, प्रशिक्षण निर्देशक (7507988552) यांच्याशी संपर्क साधावा.


Share

2 thoughts on “मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण सत्राचे आयोजन..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *